चारित्र्य मनुष्याला बनवत नाही, परंतु मनुष्य चारित्र्य निर्माण करीत असतो. |
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंत:करणाची संपत्ती ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. |
दुष्कृत्याची कबुली हीच सत्कृत्याचा प्रारंभ ठरतो. |
दुसर्यावर अन्याय करण्यापेक्षा तो अन्याय आपण स्वत: सहन करणे जास्त चांगले असते. |
निसर्गावर तुम्हाला प्रभुत्व हवे असल्यास निसर्गाचे नियम नीट पाळलेच पाहिजेत. |
हातातून जोराने फेकलेला दगड जसा परत घेता येत नाही, तसे उच्चारलेल्या शब्दांच्या बाबतीत होऊन दुष्परिणाम भोगावे लागतात. |
आपले जीवन सार्थ करायचे असल्यास, स्वत:चा विचार दुय्यम प्रतीचे ठरवून इतरांचे हित पाहावे व त्याला जपावे. |
नशीब दारापाशी येते व शहाणपण घरात आहे की नाही याची चौकशी करते. |
कृतीशिवाय जे बोलतात, त्यांची शेवटी फसगत होते. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबविणे जरूर आहे. |
दान घेण्यात वाटणारे सुख हे क्षणिक असते; परंतु दान देर्याने जे सुख प्राप्त होते ते जीवनभर पुरत असते. |
यशामुळे मतिभ्रष्टता आली की, अपयशाची गाठ पडलीच ! |
सावधगिरी हीच मनुष्यास भित्रे बनविते. |
ज्या अपेक्षा आपण पुरवू शकत नाही, त्या निर्माण करू नयेत. |
ईश्वराने बुध्दीहून उत्तम अथवा अधिक पूर्ण अथवा सुंदर असे दुसरे काही निर्मिले नाही. |
बुध्दी आणि भावना यांचा समन्वय म्हणजेच विवेक. |
झाडाच्या पानावरील दंवबिंदूप्रमाणे मानवी जीवन हे काळाच्या किनार्यावर नाच करीत असते. |
त्याग हा जीवन-मंदिराचा कळस आहे. |
जीवन ही लढाई आहे. जीवन हा यज्ञ आहे. जीवन हा सागर आहे. प्रीती आणि पराक्रम हेच जीवनाचे डोळे ! |
जीवन विफल होण्याच्या भीतीसारखा दुसरा शाप नाही. |
गरज कायदा ओळखत नाही. |
सुधारणा म्हणजेच ज्याच्यामुळे मनुष्य आपले कर्तव्य बजावीत राहतो ते आचरण. |
मोठमोठी कामे ही ताकदीने केली जात नाहीत, तर ती सहनशक्तीने होतात. |
थोरांच्या दुर्गुणांचीदेखील गुण म्हणून वाखाणणी केली जाते. |
मानवाच्या खोलवर अशा अनुभवांना फुटलेली वाचा म्हणजे धर्म. |
कोवळे स्मित म्हणजे दु:खावरचे मलम. |
जे अंत:करणातून निपजते तेच अंत:करणाला जाऊन भिडते. |
आत्म्याची सुधारणा हा सर्व सुधारणांचा आत्मा आहे. |
कळकळ ही जीवनाची सुरूवात करते; तर त्याग त्याचा शेवट करतो. |
कर्माने, प्रज्ञेने वा धनाने नव्हे; त्यागानेच अमृतत्त्वाचा लाभ होईल. |
पायदळी चुरगळलेली फुले, चुरगळणार्या पायाला आपला सुगंध अर्पण करतात. खर्या क्षमेचे कार्य हेच आहे. |
अभिमानाचा त्याग करणारा माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो. राग सोडलेल्यास दु:ख होत नाही. अभिलाषा सोडलेला माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडलेला खरा सुखी होतो. |
नुसत्या गंमतीला किंमत नाही, तर हिंमतीला आहे. |
आवड असावी म्हणजे सवड आपोआप होते. |
जीवन म्हणजे आश्चर्याची मालिकाच ! उद्याचा रागरंग आपणास आज कधीच समजणार नाही. |
खरा धर्म हा बड्या लोकांच्या चैनीची वस्तू नसून, सर्व लोकांची ती मूलभूत गरज आहे. |
जो स्वत:च कुणाचा तरी गुलाम असतो, त्यालाच दुसर्यावर हुकमत गाजवाविशी वाटते. |