आजचा पुरूषार्थ उद्याचे भाग्य ठरणार आहे. |
गर्वाने देव दानव बनतात, तर नम्रतेमुळे मानव देव बनतो. |
धैर्य ही आनंदाची चावी आहे. |
अनेक मूल्यवान पदार्थांनी भरलेले विश्व जरी मनुष्याला दिले, तरी त्याचे समाधान होणार नाही, कारण मोह हा अनिवार्य आहे. |
चालीरीती म्हणजे सद्गुणांच्या पडछाया. |
त्यागाशिवाय समता नाही, समतेशिवाय शांती नाही आणि शांतीवाचून प्रगती नाही.त्यागाची शक्ती हेच अलौकिकत्व. |
परमार्थामध्ये अधिकार कोणी कोणाला देऊन येत नसतो. आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. |
लांब जीभ आयुष्य कमी करते. |
ज्ञान दाखविण्यापेक्षा, अज्ञान लपविणे कठीण असते. |
कला ही भूतकाळाची कन्या, वर्तमानकाळाची पत्नी आणि भविष्यकाळाची माता असते. |
अहंकार हा तपसाधनेचा महान शत्रू आहे. |
विचार परिपक्व झाले की शब्दांचे रूप घेऊन कागदावर उतरवता येतात. |
ज्ञानाशिवाय मनुष्य आंधळा आहे आणि कलेशिवाय जीवन नीरस आहे. |
भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे. |
प्रतिभा ही अनंत परिश्रमाने सामावलेली असते. |
सत्याचा शेवट सुख-समाधानाच्या वाटेने जातो. |
अचल प्रीतीची किंमत चंचल संपत्तीने कधी होत नाही. |
ढोंग म्हणजे सद्गुणापुढे दुर्गुणाने स्वीकारलेली हार आहे. |
दु:ख अनावर झाले की माणसाला हसू येते, आणि सुखाचा अतिरेक झाला की रडू येते. |
लबाडी केल्यामुळे तात्पुरते फायदे होतात, पण कायम स्वरूपाच्या कल्याणाचा नाश होतो. |
पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवावा. |
कामक्रोधांना आपसात लढवून मारणे यात ज्ञानाचे कौशल्य आहे. |
महत्वाकांक्षेला किल्ली दिल्यावर संकटांचे, नशिबाचे काटे आपोआप फिरतात. |
माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे, तर घामाच्या धारांनी. |
खुशामत जो करतो व जो करून घेतो ते दोघेही आपले व्यक्तिमत्व भ्रष्ट करतात. |
समजूत व विवेक यांचा साहजिक परिणाम संभाव्य आपत्तीविरूध्द वेळेवर उपाय योजणे हा होय. |
चांगली, योग्य पत्नी म्हणजे कुटुंबाची शोभा व घराची लक्ष्मी असते. |
मनुष्याच्या मागे फक्त त्याचा चांगुलपणा राहतो, बाकी सर्व नष्ट होते. |
हिंमत ही अंत:करणातून निर्माण होणारी वस्तू आहे; संपत्तीच्या आकड्यात निर्माण होणारी नाही. |
नावे ठेवणे सोपे आहे; परंतु नाव कमावणे अवघड आहे. |