हे जीवन म्हणजे भावी जीवनाची मशागत होय. तिथे पीक घेता यावे म्हणून भली लागवड करा. |
शेकडो थोर विचार, भावना व आकांक्षा मनात बाळगण्यापेक्षा; एकच सत्कृत्य आपल्या हातून झाले तर त्याचे मूल्य अधिक आहे. |
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चात्तापाचे शंभर दिवस येत नाहीत. |
दिवा अंधार खातो, त्यामुळे काजळीची उत्पत्ती होते. तद्वतच आपण ज्या प्रकारचे अन्न खातो, त्याच प्रकारचे आपले आचारविचार होतात. |
वाढत्या वयामुळे सुरकुत्या पडणारच असतील तर त्या शरीरावर पडोत, मनावर नकोत. |
आपत्ती नेहमी हानी करण्यासाठी येते असे नव्हे |
आळस इतका सावकाश प्रवास करतो की दारिद्रय त्यास ताबडतोब गाठते. |
हाताचे भूषण दान करणे हे आहे. कंठाचे भूषण सत्य बोलणे हे आहे. शास्त्रवचने ऐकणे हे कानाचे भूषण आहे. इतके असताना बाह्य आभूषणांची गरजच काय? |
राईएवढा दोष लपविण्याने तो दोष पर्वताएवढा मोठा होतो; पण तो दोष कबूल केल्याने नाहीसा होतो. |
स्वर्ग किंवा नरक स्वत:च्या कृत्यांनी बनविता येतो, म्हणूनच सत्कर्मे करा. |
जीवन म्हणजे फसवणूक ! आशेने मूर्खात काढल्यामुळे ह्या फसवणुकीला आपण कौल देतो. उद्या हा कालच्यापेक्षा जास्तच फसवणूक करतो. |
घर ही स्वातंत्र्यभूमी आहे. जगामध्ये ह्याच जागेवर मनुष्य वाटेल ते प्रयोग करू शकतो. |
संभाषण करताना ज्याचा मागून पश्चाताप करावा लागेल, असा एकही शब्द उच्चारता कामा नये. |
लहान लहान बोबड्या बाळांच्या ओठातून व अंत:करणातून दिसून येणारा थोर परमेश्वर म्हणजेच आई ! |
जीवन एक पुष्प आहे, प्रेम हा त्याचा सुगंध आहे. |
पुस्तके म्हणजे तुमचे मन निर्मळ करणारा साबण आहे. |
जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे. |
जितक्या अपेक्षा कमी, त्या प्रमाणात मनाला शांतता अधिक लाभते. |
खरा सामर्थ्यवान तोच की, जो दुसर्याची चूक झाली तरी त्याला क्षमा करून कायमचा आपला करतो. |
निरोगी शरीर व निष्पाप मन ही दोन असली म्हणजे त्यात सर्व काही आले. |
आपली जसजशी प्रगती होत जाते, तसतशा प्रगतीच्या मर्यादा जास्त जास्त जाणवू लागतात. |
कर्ज काढणे ही एखादी जड वस्तू डोंगरमाथ्यावरून खाली लोटून देण्याइतके सोपे आहे, परंतु ते फेडणे म्हणजे तीच वस्तू खालून डोंगरमाथ्यावर वाहून नेण्याइतके कष्टप्रद आहे. |
मूर्ख मनुष्य आपले हृदय जिभेवर ठेवतो. तर शहाणा आपली जीभ हृदयात लपवून ठेवतो. |
चांगल्यातला चांगुलपणा जाणायलासुध्दा अंगी चांगुलपणा असावा लागतो. |
बुडणार्याला सहानुभूती म्हणजे त्याच्याबरोबर बुडणे नव्हे. |
स्वत:च्या बुध्दीनं चालून चूक करण्यापेक्षा दुसर्यानं दाखविलेल्या मार्गानं चालणं अधिक चांगलं. |
जे तलवार चालवतील ते तलवारीनेच मरतील. |
अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल महान आहे. |
पायदळी चुरगाळली जाणारी फुले चुरगाळणार्याच्या पायांना मात्र सुगंध देतात. |
मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते. |
विद्येचे फळ म्हणजे चारित्र्य आणि सदाचार. |
मनाने संत बनायला पाहिजे, नुसते बाहेरून संत बनणे हे योग्य नाही. |
कीर्तीची नशा दारूच्या नशेपेक्षा भयंकर असते. एक वेळ दारू सोडणे सोपे आहे; परंतु कीर्तीचा हव्यास सोडणे अत्यंत कठीण आहे. |
भुतं जगात नसली तरी ती माणसाच्या मनात असतात. |
दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो. |