जो चांगल्या वृक्षाचा आश्रय घेतो, त्याला चांगली छाया लाभते. |
आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय. |
जो सदाचारी असतो, तो देवळाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो व जो सर्वांवर मन:पूर्वक प्रेम करतो तो देवळाच्या गाभार्यात पोहोचतो. |
पैशाने सर्व काही मिळते असे ज्यांना वाटले, ते साहजिकच स्वत: पैशाकरिता काहीही (भलेबुरे) करतील असे गृहीत धरावे. |
लीनता व विनयशीलता ह्या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत. |
जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते, तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते. |
त्यागामध्ये शांतीचा निरंतर वास असतो. |
वेदशास्त्रपारंगत असणारा गरीब चांगला; परंतु धनवान मूर्ख फार वाईट. |
ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते, त्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे. |
मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही. |
तुमचे सौख्य तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. |
परमेश्वर खर्या भावनेला, उत्कट निश्चयाला साहाय्य करतो. |
सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या-वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो, परंतु स्वत: मात्र पूर्णपणे शुध्द राहातो, अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडविले पाहिजे. |
इमानीपणामुळे गुलमगिरीतदेखील उदारतेचा अंश चमकतो. |
जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील. |
सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. |
समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत. |
दु:ख आणि सुख हे अंध:कार आणि प्रकाश याप्रमाणे पाठलाग करीत असतात. |
दारिद्रयाची गंगोत्री पैशाच्या अभावात नसून ती माणसाच्या विचारात आहे. |
काही रोगांवरील उपाय त्या रोगांपेक्षाही भयंकर असतात. |
जी उदात्त कृत्त्यें लपलेली असतात, त्याच कृत्त्यांचा जास्त उदोउदो होतो. |
सर्व विजयांमध्ये स्वत:च्या मनावरील विजय हा सर्वात महान होय. |
व्यक्तीप्रमाणे राष्ट्रे जन्माला येतात आणि नाहीशी होतात; परंतु संस्कृती मरू शकत नाही. |
संस्कृती ही एक चळवळ आहे आणि परिस्थितीवादी एक जलपर्यटन आहे; परंतु बंदी नव्हे. |
प्रार्थनेमुळे देव बदलत नाही; तर ती प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते. |
आशावादी अपयश विसरण्यासाठी कष्ट करतो, हसतो आणि निराशावादी हसण्याचेच विसरून जातो. |
हजार सूर्य एकत्रित केलेत, तरी सत्यरूपी सूर्याची बरोबरी करता येणार नाही. |
भय म्हणजे मनुष्याचे अंत:करण, त्याला त्याच्या अपराधाबद्दल देत असलेला कर आहे. |
आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे. |
सुखदु:खातील भेद म्हणजे सुखाला भागीदार मिळाले तर ते वाढत राहाते आणि दु:खात जर कोणी वाटेकरी झाले तर ते कमी होते. |
गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणार्या संधीचे स्वागत करा. |
तुम्ही स्वत:ला मेंढरू बनविल्यावर लाडंगा तयारच असतो. |
चिखलात उगवलेली सर्वच फुले काही कमळाची नसतात. |
मोठी मने तत्त्वविचारांची चर्चा करतात, सामान्य मने घटनांची चर्चा करतात; तर क्षुद्र मने व्यक्तींची चर्चा करतात. |
नास्तिक बरा पण दांभिक वाईट. पहिला प्रामाणिक असतो, तर दुसरा प्रामाणिकतेचं ढोंग करतो. |
पैसा बोलतो, तेव्हा सत्य मुकं असतं. |
सुखापेक्षा दु:खामुळे होणारी ज्ञानप्राप्ती श्रेष्ठ दर्जाची असते. |