तुमचा शेजारी म्हणजे तुमचाच आरसा होय. |
झोपडपट्टी ही संस्कृतीचे मोजमाप आहे. |
वासना उपभोगल्याने तृप्त होत नाहीत, उलट चेकाळतात. |
धनवान असणारा कंजुष मनुष्य, गरीबापेक्षा अधिक दरिद्री असतो. |
सत्य आणि न्याय ह्याहून कोणताच धर्म मोठा नसतो. |
मानवी जीवनातील अर्धी दु:खे परस्परातील दया, परोपकार आणि सहानुभूतीने कमी करता येतात. |
लाकूड जळते कारण त्यामध्ये जळण्याजोग्या वस्तू असतात. तसेच मनुष्य सत्कीर्ती संपादतो कारण त्यासाठी आवश्यक गुण त्याच्यामध्ये असतात. |
प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो. |
जी हानी आपण करतो आणि जी हानी आपण सहन करतो - या दोन्ही गोष्टी एकाच तागडीत तोलता येत नाहीत. |
ज्या वेळी न्यायाधीशच चोर्या करतात, त्या वेळी चोरांना चोरी करण्याचा अधिकारच प्राप्त होतो. |
प्रार्थनेने इच्छाशक्ती वाढते; इच्छाशक्ती वाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य येते, हुरूप येतो, उत्साह वाढतो, जीवन जगावेसे वाटते. |
बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही. |
जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो. |
समजेल अशा तऱ्हेने सत्य सांगत गेले, तर कोणालाही त्याविषयी अविश्वास वाटत नाही. |
जगातील निम्मी दुष्कृत्ये भित्रेपणामुळे घडत असतात आणि जो असत्य बोलावयास घाबरतो तो या जगात दुसर्या कोणत्याही गोष्टीला घाबरत नसतो. |
जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरीखरी कसोटीच होय. |
एखादी व्यक्ती जे बंधन स्वत:वर आपल्या बुध्दीने लादून घेते, ते आचरण्यात तिला एक प्रकारचा आनंद असतो, अभिमान वाटतो. |
प्रार्थनेमुळे अहंकार नष्ट होत राहतो. |
यौवन आणि आशा यांची जोडी अभंग आहे. |
जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे. जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले. |
हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थ आहे. |
एखाद्या हल्ला करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्या स्तुती करणार्या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय. |
जो पाप करतो तो माणूस, ज्याला त्याबद्दल दु:ख वाटते तो संत, जो त्याबद्दल फुशारकी मारतो तो सैतान. |
सद्गुणाला कधीही वार्धक्य येत नाही. |
देवळे आणि धर्म नष्ट झाल्यानंतर ईश्वर हा स्वत:चे मंदिर मानवाच्या हृदयात उभारत असतो. |
शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे व आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहातो. |
दानशूर व्यक्तीच्या धनसंचयातील धन कधीच कमी होत नाही. |
सर्व कलांमध्ये `जीवन जगण्याची कला' हीच श्रेष्ठ कला आहे. |
जोपर्यंत मनुष्याला कामिनी व कांचनाचा मोह सुटत नाही, तोपर्यंत त्याला परमेश्वराचे दर्शन होऊ शकणार नाही. |
सत्य, क्षमा, संतोष, ज्ञान, धैर्य, शुध्द मन आणि मधुर वचन म्हणजे प्रार्थनेची प्रार्थना होय. |
दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे. |
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते. |
खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसर्यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच होतो. |
थोर मनुष्यच दुसर्या थोर व्यक्तीला आकर्षू शकतो. गुणी माणसाला गुणांची किंमत कळते व दुसर्या माणसाबद्दल आपुलकी वाटते. |
पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात. |
संकटांची जितकी पत्रास राखावी, तितकी ती अधिकाधिक मिजासखोर बनत जातात. |
मनाच्या जखमेला सहानुभूतिशिवाय औषध नाही. अश्रूंनीच हृदये कळतात आणि अश्रूंनीच हृदये मिळतात. |
असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो गुणी असल्यामुळे त्याला चिंता त्रास देऊ शकत नाही; तो सुज्ञ असल्यामुळे त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नाही आणि तो शूर असल्याने त्याला कधीही भीती ग्रासत नाही. |