कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो. |
प्रीती म्हणजे केवळ क्षणिक वासनेची तृप्ती नव्हे ! माणसाला स्वत:पलीकडे पाहायला लावणारी उदात्त भावना आहे ती ! |
काही काही दु:खं एकट्यानंच सोसण्यात सुख असतं. |
मृत्यूच्या छायेत माणसाचा आत्मा जागृत होतो हेच खरं. |
वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दु:ख हेच आहे की त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही ! |
भक्तीचं रूप घेऊ शकते तीच खरी प्रीती. |
प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते. |
माणुसकीची वाढ म्हणजे सुधारणा. |
भक्ती हे सोंग नाही, मन सुधारण्याचा तो एक मार्ग आहे. |
निष्ठेने जे आपली कार्ये करतात: ते परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरून उन्नती पावतात. |
ज्वाळांनी जळू शकत नाही, संकटाने पडू शकत नाही, स्वार्थाच्या विचाराने पोखरलं जात नाही, त्याला घर म्हणतात. |
मुलांना अक्कल येण्याचे वय येते, तेव्हा मोठ्यांची अक्कल गेलेली असते. |
मनुष्याची मुद्रा म्हणजे जीवनग्रंथ. डोळे म्हणजे तर जीवनातील अनुभवाने भरलेले डोह. |
ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ |
गरूडाचे पंख लावून चिमणी पर्वताचं शिखर गाठू शकेल का? |
उदात्त दु:ख हेच क्षुद्र दु:खावरचं या जगातलं उत्कृष्ट औषध आहे. |
प्रत्येक काळया ढगाला रूपेरी किनार असते हे विसरू नका. |
प्रत्येक वस्तूंत आणि व्यक्तीत सौंदर्य, सामर्थ्य आणि साधुत्व यापैकी काही ना काही लपलेलं असतं. |
भीती म्हणजेच सुरक्षिततेचा पाया. |
भिंतींना कान असतात आणि कुंपणांना डोळे असतात. |
एखादे लहानसे छिद्रदेखील विशाल जहाजाला बुडविते. |
साधू किंवा संत सद्गुणांचे आचरण अशा रीतीने करतो, की ते कुणासही आकर्षक वाटावे. |
रिकामं पोतं सरळ उभं राहू शकणारच नाही. |
उघड दिसणारे वैभव साधूलाही मोहात पाडू शकते. |
मोठा मासा लहान माशाला गिळतो. |
हिरा हिर्यालाच कापू शकतो. |
साम्राज्यापेक्षाही समाधानाची किंमत जास्त आहे. |