स्तुतीने चांगली माणसे सुधारतात, तर वाईट माणसे बिघडतात. |
सत्तेची हाव हा एक अत्यंत प्रबळ विचार आहे. |
चांगल्या धनुर्धराची ओळख त्याने धरलेल्या नेमावरून समजते. जवळ बाळगलेल्या बाणावरून नाही. |
दु:खद घटना येताना गरूडाच्या भरारीने येतात आणि जाताना मात्र मुंगीच्या पावलंनी जातात. |
जीवन हा एक धुळीने माखलेला रस्ता आहे. त्यावर अगदी जपुन पावले टाकली पाहिजेत. |
उत्पत्तीशिवाय स्थिती नाही, स्थितीशिवाय लय नाही, लयावाचून पुन: उत्पत्ती नाही. |
क्वचित अर्थ न कळला, तरी नित्य पठनानेही आपली वाणी पवित्र होते व हळू हळू मन शुध्द होत राहाते. |
स्वत:च्या वाट्याला जरी काटे आले असले, तरी दुसर्याला गुलाबाची सुंदर फुले देता येतात. |
आत्मविश्वास, इच्छाशक्ती व दृढ निर्णय ह्या त्रिवेणी संगमाने जीवनाचा झरा जलद वाहत जातो. |
स्वार्थाची ढाल आणि दुष्कृत्यांची तलवार हाती घेऊन लढणारा वीर स्त:च्या मरणाला कारणीभूत होतो. |
कीर्तीरूपी दंवबिंदूंनी हृदयरूपी पान जास्त चमकत राहाते. |
पापी माणसे तोंडानं बळकट असतात; पण अंत:करणांनं दुबळी असतात. |
विश्रांती मिळविण्याची धडपड करण्यातच माणसे थकून जातात. |
मृत्यू हा माणसाला दिलेला शाप आहे, तर प्रीती हा उ:शाप आहे. |
जी माणसे आपल्या कुवतीप्रमाणे इच्छा करतात, सामर्थ्यानुसार काम करतात व कुणाचा अनादर करीत नाहीत; ती माणसे कर्तव्यदक्ष समजावीत. |
दाट धुक्याने क्षणभर दृष्टीला दिसत नाहीसा होणारा पर्वत जेथल्या तेथे व जसाच्या तसाच राहतो. धुके लवकरच निघून जाते. |
मनुष्याला राग आला की तो किती खोटे बोलतो याला सुमारच नसतो. कारण रागाच्या भरात त्याची विचारशक्ती व सत्याबद्दलची निष्ठा नाहीशी होऊन गेलेली असते. |
दु:खी माणासाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. |
बहीण-भावाच्या प्रेमात पवित्रता असते; तर पती-पत्नीच्या प्रेमात मादकता असते. प्रेमाचे पावित्र्य शांती देते, तर मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते. |
चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. |
प्रतिभा ही चारित्र्याची दासी आहे. |
विवाह-होमात जर खरोखरी कसली आहुती द्यावी लागत असेल; तर ती जीविताकडे पाहण्याच्या साहसी वृत्तीची. |
दोन अपूर्ण माणसांना एकमेकांना पूर्ण करण्याची जी विलक्षण तळमळ लागते तिचेच नाव प्रीती. |
नीतीचा खून समाजाला पाहवत नाही. पण माणसाचे खून समाज हसतमुखाने पाहतो. माणसासाठी नीती असते. नीतीसाठी माणूस नसतो. |
गुलाबाला काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो म्हणून मजा मारावी हे उत्तम ! |
जगात पैशासाठी जितक्या लबाड्या केल्या जातात, त्यापेक्षा जास्त लबाड्या कीर्तीसाठी व नेतृत्वासाठी केल्या जातात. |
कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा ही आजची भाकरी आहे. |
जो समाजास नेत्राने, मनाने, वचनाने व आचरणाने खूष करतो, त्याच्यावर समाज खूष असतो. |
ोणतेही तत्व जोपर्यंत स्वत:च्या आड येत नाही, तोपर्यंत त्याची पूजा करायला लोक तयार असतात; पण ज्या क्षणी ते त्यांच्यावर उलटते, त्या क्षणी ते त्यला दूर भिरकावून देतात. |
तासभराचे ध्यान हे वर्षभर केलेल्या पूजेअर्चेहून श्रेष्ठ होय. |
सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे; पण सज्जन म्हणून मरणे आयुष्यभरची कमाई आहे ! |
अपराधावाचून क्षमा करणे आणि पराक्रमावाचून बक्षिस देणे, या दोन्ही गोष्टी सारख्याच वेडगळपणाच्या आहेत. |
अज्ञ, श्रध्दाहीन व संशयखोर मनुष्याला कधीही सुख मिळत नाही. |
उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते. |
दिलदार हृदयाशिवाय धनवान मनुष्यदेखील भिकारीच असतो. |
हृदयात अपार सेवा भरली की, सर्वत्र मित्रच दिसतात. |
जेव्हा मित्रच मित्राला बरबाद करतात, तेव्हा पेटलेल्या हृदयात शत्रुत्व धगधगते. |
झाडाला पेटवून त्यांची राख करण्यास अजिबात वेळ लागत नाही; पण तीच झाडे रूजवून वाढविण्यास खूप काळ लागतो. |