ब्रेड
साहित्य :- |
चार वाट्या मैदा, दोन चमचे मीठ, चार चमचे साखर, दोन चमचे डालडा, आठ चमचे ताक, दीड चमचा यीस्ट |
कृती : |
एक कप उकळते पांणी साखरेवर ओतावे. साखर विरघळल्यावर यीस्ट पसरून घालावे. यीस्ट घातल्यावर पाणी हलवू नये. साधारणपणे दहा मिनिटांनी ते फुगेल. एका थाळयात दोन चमचे डालडा घेऊन खूप फेसावे. मग त्यात अर्धा कप गरम पाणी घालावे. नंतर त्यात मैदा घालावा व पीठ सारखे करावे. गोळी होवू देवू नये. नंतर त्यात वर तयार करून ठेवलेले यीस्ट घालावे व चांगले मळावे व ते पीठ ब्रेड करावयाच्या भांड्यात घालावे. ते फुगून झाल्यावर ओव्हनमध्ये ठेवून भाजावे. |