दीड वाटी रवा, एक वाटी दूध, एक वाटी दही, एक वाटी साखर, सात-आठ वेलदोडे, बेदाणा, अर्धा चमचा खाण्याचा सोडा, अर्धी वाटी साजूक तूप अगर लोणी, खाण्याचा केशरी रंग. |
प्रथम दह्यात साखर घालून चांगले घोटून घ्यावे. नंतर त्यात दूध, रवा, वेलदोड्याची पूड, बेदाणा, थोडेसे मीठ, तूप, सोडा व हवा असल्यांस इसेन्स व रंग घालून पुन्हा चांगले खूप घोटावे. नंतर हे मिश्रण तसेच चार ते पाच तास ठेवून द्यावे. नंतर एका पसरट भांड्याला एक चमचा तूप लावून त्यात ते मिश्रण ओतावे. नंतर ओव्हनमध्ये ते भांडे ठेवून केक भाजून घ्यावा. ओव्हन नसल्यास मंद विस्तवावर एक जाड तवा ठेवून त्यावर वाळू घालावी व त्यावर ते भांडे ठेवावे. त्या भांड्यावर दुसरा जाड तवा ठेवून त्यावरही तापलेली वाळू घालावी. |