चॉकलेट
साहित्य :- |
सहा चमचे कोको किंवा आठ चमचे ड्रिंकींग चॉकोलेट, एक सपाट वाटी दुधाची पावडर, दीड वाटी साखर, अर्धी वाटी लोणी. |
कृती : |
साखरेचा साखर बुडेपर्यंत पाणी घालून एक-तारी पाक करावा. त्यात दुधाची पावडर व कोको अगर ड्रिंकींग चॉकोलेट घालावे. कजीव करून घेऊन त्यात लोणी घालावे व चांगले शिजवावे. शिजत असताना चांगले घोटत राहावे. शिजून गोळा झाल्यावर ताटात तो गोळा थापावा व लगेच वड्या पाडाव्यात. |