बालूशाही

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी आंबट दही, अर्धी चिमटी सोडा, पाकाकरिता साखर व तळण्याकरिता तूप.

कृती :

मैद्यात अर्धी वाटी तूप, दही व सोडा घालून मैदा पाण्यात भिजवावा. अर्ध्या तासानंतर त्याच्या लहानशा लाडवाएवढ्या गोळया करून त्या हाताने पेढ्यासारख्या चपट्या करून घ्याव्या. नंतर त्या गोळया तुपात तांबूस रंगावर मंद तळून काढाव्यात. नंतर साखरेचा पक्का पाक करून त्यात त्या तळलेल्या गोळया घालून चार-पाच मिनिटे ठेवाव्या व ताटाला तुपाचा हात लावून त्यात त्या काढून घ्याव्यात पाक सुकला म्हणजे बालूशाही तयार झाली.

Hits: 401
X

Right Click

No right click