औदुंबर
सांगली शहरापासून सुमारे २५ कि. मी. अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर श्री गुरू दत्तात्रयांचे हे स्थान आहे. नरसोबाची वाडी किंवा गाणगापूर या स्थानांप्रमाणेच औदुंबरला दत्तभक्तांच्या दृष्टीने मोठे स्थानमहात्म्य लाभले आहे. औदुंबर गावाच्या परिसरात औदुंबराची असंख्य झाडे असल्यानेच बहुधा या स्थानास औदुंबर हे नाव पडले असावे. औदुंबर हे गाव तसे लहान आहे पण त्याचा महिमा मोठा आहे. येथील ब्रम्हानंद स्वामींचा मठ तसेच भुवनेश्वरी देवीचे मंदिर पाहण्यासारखे आहेत. |
अक्कलकोट
![]() |
|
|
|
इ.स. १८७८ मध्ये त्यांनी अक्कलकोट येथेच समाधी घेतली. त्यावेळी त्यांचे वय ५०० वर्षाहूनही अधिक होते असं मानलं जातं. नंतरच्या काळात सिद्धपुरूष म्हणून परिचित असलेले श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्यामुळेही अक्कलकोट हे भाविकांचं श्रद्धास्थान झालं आहे. अलिकडेच श्रीगजानन महाराजांनी समाधी घेतली. अक्कलकोट हे या दोन तपस्वी पुरूषांच्या वास्तव्याने पुनीत झालेले शहर आहे. |
अंबेजोगाई
मराठवाड्यातील सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे हे शहर परळी वैजनाथपासून अवघ्या ३५ कि. मी. अंतरावर आहे. अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे भव्य मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. या मंदिराची रचना हेमाडपंती शैलीची असून मंदिर उत्तराभिमुख आहे. देवळास चहू दिशेस महाद्वार आहे. मंदिराचे बांधकाम व त्यावरील शिल्पाकृती पाहून मन थक्क होते. दगडी खांब व तुळयांवरील बारीक नक्षीकाम अतिशय रेखीव आहे. उत्तर महाद्वाराच्या बाहेर लगोलग सर्वेश्वर तीर्थ आहे. मंदिराच्या परिसरात काही सत्पुरूषांच्या समाध्या आहेत. पश्चिम दरवाजाला लागूनही अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. नवरात्रात येथे महोत्सव असतो. मार्गशीर्ष महिन्यातही येथे उत्सव असतो. शहरापासून २-३ कि. मी. अंतरावर बालाघाटातील एका डोंगरात मराठीतील आद्यकवी मकुंदराजांची समाधी आहे. हा संपूर्ण परिसर शांत व सुंदर आहे. जवळच जयंती नदी डोंगराच्या कड्यावरून खाली दरीत कोसळते. या दरीस अश्वदरी असे म्हणतात. संतकवी दासोपंत यांनी अंबेजोगाईस वास्तव्य करून आपली साहित्य रचना केली. त्यांचे निवासस्थान एकमुखी दत्तात्रेयाचे मंदिर आहे. मार्गशीर्ष महिन्यात येथे दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. अमलेश्वर, सकलेश्वर ही मंदिरे जांभुळवेट व अनेक सिद्ध पुरूषांची साधनास्थाने या परिसरात आहेत. |
आळंदी
|
||
वारकरी संप्रदायात पंढरपूर इतकेच आळंदी या तीर्थस्थानासही मोठे महत्त्व आहे. पुणे शहरापासून अवघ्या २२ कि. मी. अंतरावर हे स्थान असून ते देवाची आळंदी या नावानेही प्रसिद्ध आहे. इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या या गावी संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली (इ.स. १२९६). त्यामुळेच आळंदीचं महत्व फार मोठं आहे. महाराष्ट्रात विठ्ठलभक्तीचा सुकाळ करून वारकरी संप्रदाय निर्माण करणारे लोकोत्तर संत म्हणून सातशे वर्षे अवघ्या महाराष्ट्राने ज्ञानेश्वरांना आपल्या हृदयात जपले आहे. `ज्ञानदेवे रचिला पाया । कळस तुकयाने चढविला' या ओळीनुसार भागवत धर्माची धुरा खांद्यावर वाहणारे हे दोन थोर संत महाराष्ट्राच्या लोकजीवनात अखंड विराजमान झाले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान, विठ्ठल-रखुमाईचे मंदिर, सोन्याचा पिंपळ अशी अनेक स्थाने या तीर्थस्थानी भक्तिभावाने पाहण्यासारखी आहेत. याठिकाणी आषाढी-कार्तिकी एकादशीला यात्रा भरते तसेच ज्ञानेश्वर समाधी दिनी कार्तिक कृ. त्रयोदशीला येथे उत्सव असतो. |