महागणपती
मंदिर पूर्वाभिमुख असून त्यास इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे. गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला असून शिंदे, होळकर आदि सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे सहाय्य दिले आहे. |
सिद्धीविनायक
हे गणेश स्थान अहमदनगर जिल्ह्यात आहे. दौंड आणि श्रीगोंदा या ठिकाणापासून जवळ आहे. `सिध्दीविनायक' नावाने येथील गणपती प्रसिध्द आहे. येथील गणेशमूर्ती स्वयंभू असून ती उजव्या सोंडेची आहे. तिचे रूप गजमूख आहे. मंदिर उत्तराभिमुख असून गाभारा मात्र प्रशस्त आहे. जवळच भीमा नदी असल्याने या नदीच्या परिसरात सुंदर घाट बांधण्यात आले आहेत. जवळच विष्णू, शिवाई, महादेव आदि देवांची मंदिरे आहेत. |
बाहुबली
![]() |
|
|
|
त्यावेळी या डोंगराचे नांव बाहुबली डोंगर नव्हते पण डोंगरावरील जिनप्रतिमा, चैत्यालये यांच्या वर्णनावरून तोच असावा असे दिसते. प्राचीन काळापासून बाहुबलीचा डोंगर जैन मुनींची तपस्याभूमी म्हणून ओळखला जात असल्याचे दिसते. आजही या ठिकाणी आठशे वर्षापूर्वीची ६० फूट उंचीची १००८ भगवान बाहुबलींची अतिशय सुंदर, कलापूर्ण मूर्ती व प्राचीन सहस्त्र जिनबिंब आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत उभे आहेत. ही बाहुबलीची मूर्ती इ.स. ११५६ मध्ये शके १०७८ च्या वैशाख शुध्द दशमीस श्री १०८ श्रृतसागर मुनिराज यांच्या प्रेरणेने स्थापन झाल्याचा उल्लेख दिगंबर चैन तीथक्षेत्र डिरेक्टरीमध्ये मिळतो. सुमारे ३०० वर्षापूर्वी नांद्रे येथील बाहुबली मुनींनी येथे केलेली तपश्चर्या, १९२६ मध्ये तेथे झालेला चक्रवर्ती आचार्य शांतीसागर महाराज यांचा चातुर्मास, धर्मप्रेमी श्री कल्लाप्पा निखे यांनी घातलेला रत्नत्रय मंदिराचा पाया व त्यासाठी बांधलेली दुमजली चिरेबंदी भव्य इमारत या सर्व गोष्टीमुळे या भागात या पहाडाला जैन धर्मियांच्या दृष्टीने वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. |
चिंतामणी
पुणे जिल्ह्यातील व पुणे शहरापासून अगदी नजिक असलेल्या या देवस्थानी असलेला गणपती `श्रीचिंतामणी' या नावाने ओळखला जातो. थेऊर येथील गणेशमूर्ती स्वयंभू व उजव्या सोंडेची आहे. मंदिराचे महाद्वार उत्तरभिमुख आहे पण मूर्ती मात्र पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून सभामंडपही मोठा आहे. देवळाच्या तिन्ही बाजूंना मुळा व मुठा या दोन नद्यांचा वेढा आहे. पुणे नजिकच्या चिंचवड येथील मोरया गोसावी या तपस्वी पुरूषाने या ठिकाणी गणपतीची उपासना करून सिद्धी प्राप्त केली होती, असा ऐतिहासिक दाखला असून थेऊर येथील मंदिर मात्र मोरया गोसावी यांचे सुपुत्र चिंतामणी देव यांनी बांधले आहे. श्रीमंत माधवराव पेशवे यांना या गणेशस्थानाबद्दल अखेरपावेतो प्रेम वाटत होते. त्यांचा मृत्यूही या मंदिराच्या आसमंतातच झाला. |
देहू
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महारांजाचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदैव वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या ६ कि. मी. अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे. आज या डोंगरावर जाण्यासाठी थेट पक्का रस्ता आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोहही इंद्रायणीकाठीच नजिक आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते. देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळयाचे मंदिर आदि स्थाने दर्शनीय आहेत. तुकारामबीजेला म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो. |