प्रकरण १ - भौगोलिक परिणाम

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन Written by सौ. शुभांगी रानडे

भौगोलिक रचना, पाण्याचे असमान वाटप व त्यामुळे उत्पादनावर होणारा परिणाम:

भौगोलिक रचनेमुळे निसर्गत:च झालेले पाण्याचे असमान वाटप हा देखील पाणीपुरवठ्याच्या संदर्भातून लक्षात घेण्याजोगा असा एक अतिगंभीर प्रश्न आहे. पृथ्वीवरील एक तृतीयांशाहून अधिक भू-भाग असा आहे की, तेथील मानवी प्रयत्नांना केवळ पाण्याच्या दुभिक्षतेमुळे खीळ बसली आहे. पाणीच उपलब्ध नसल्याने शेती, दुग्धव्यवसाय यांची भरभराट होऊ शकत नाही. कोणतीही औद्योगिक उभारणी' करणे केवळ अशक्‍य होऊन बसते.

पृथ्वीचा अंदाजे २१ प्रतिशत भाग पूर्णत: कोरडा' आहे. १५ प्रतिशत भाग 'कमी-अधिक प्रमाणात कोरडा ' आहे आणि निश्‍चित स्वरूपाचा पाणीपुरवठा असलेल्या क्षेत्राचा विचार केला तर ते खूपच विस्तृत असे पसरलेले आहे. या सार्‍या गोष्टींचा परिणाम म्हणूनच की काय कोणताही दोष नसताना उपासमारीने होणारे मृत्यु थांबू शकत नाहीत.

जगाच्या निरनिराळ्या भागातून उपासमारीची उदाहरणे दरवर्षी आढळून येतात. ही उपासमार थांबविणे कोणत्याही एका देशाला अशक्य आहे. एवढ्याचसाठी सर्व देशांनी एकत्र येऊन या उपासमारीविरुद्ध 'सह नाभवतु, सह नौ भुनक्तु ' अशी वृत्ती धारण करून एकत्रितपणे प्रयत्न चालविले पाहिजेत. तसे ते चालूही आहेत. या जागतिक प्रयत्नात पाण्याचा योग्य व नियंत्रित वापर करण्यावर फार कटाक्ष आहे. पाटबंधार्‍यांवर अवलंबून असलेल्या शेतीसाठी पाण्याचा उपयोग फार व्यापक प्रमाणावर होतो. पृथ्वीवरील एकूण एक हजार कोटी हेक्‍टर जमिनीपैकी १२ प्रतिशत जमीन मशागतीखाली असून त्यापैकी १५० कोटी हेक्‍टर जमीन पाटबंधाऱ्याच्या सहाय्याने भिजविली जाते. वाढणार्‍या लोकसंख्येसाठी अन्नोत्पादन वाढवावयाचे असेल तर,

(१) दर हेक्‍टरी उत्पन्न तरी वाढवावयाला हवे अगर

(२) नवीन जमीन ओलिताखाली तरी आणायला हवी.

या दोन्हीही गोष्टी करणे शक्‍य आहे, पण त्यासाठी पाण्याचे नवींन साठे उपलब्ध करणे व पाण्याचा उपयोग अधिक किफायतशीर होण्यासाठी नवीन तंत्र विकसित करणे अत्यावश्यक आहे. जमिनीतून अन्नोत्पादन करण्यासाठी ज्याप्रमाणे पाण्यावर संशोधन करणे आवश्यक आहे त्याप्रमाणेच माशांचे (1865) व पाणवनस्पतीचे उत्पादन वाढविण्यासाठी पाण्याची गुणवत्ता अधिक बारकाईने लक्ष ठेवून कायम' एका प्रतीची राखणे जरूरी आहे.

पाणी व आरोग्य:
शुद्ध व आरोग्यप्रद पाणी ही माणसाची आत्यंतिक गरज आहे. अन्न, वस्व, निरनिराळी स्वातंत्ये ही घटनेत मूलभूत हक्‍कात अंतर्भूत केली असली तरी त्यांची महती मानवी जीवित लक्षात घेता शुद्ध हवा, शुद्ध पाणी व एकांत यांच्यापेक्षा अधिक निश्‍चितच नाही- ' ग्रामीण व नागरी विभागात राहणार्‍या लोकांचे आरोग्यमान बहुतांशी ते पीत असलेल्या पाण्यावर * अवलंबून असते. म्हणूनच तर * औषध॑ जान्हवीतोयं' असं म्हटले जाते. पौण्यासाठी व सावेजनिक आरोग्यासाठी वापरेले जाणारे पाणी बर्‍याच वेळी' मानवाच्या स्वास्थ्यावर व क्रियाशीलतेवर अनिष्ट परिणाम घडवून आणते. पिण्याच्या पाण्याची कमंतरता हा जवळजवळ सर्व देशांचाच प्रश्‍न असला तरी विकसनशील देशात तो अधिकच उग्र आहे. स्वतंत्र ' जगातील ज॑वळजवळ १०० कोटी लोकांना निर्धोक पाणी मिळत नाही. अर्थातच त्यामुळे, त्यापैकी बरेचसे लोक या ना त्या जलवाहित रोगाने कधी काळी पछाडले जातात. त्यातील जवळपास १० दश लक्ष माणसे मृत्युमुखी पडतात. या बळींमधील सिहाचा वाटा लहान निष्पाप अर्भकांचा असतो हे विसरून चालणार नाही. आमांश, विषमज्वर, पटकी, जंठरांत्रदाह हे दुषित वा अस्वच्छ पाण्यामुळे होणारे रोग सुपरिचित आहेत. अस्वच्छ पाण्यामुळे काही रोग फॅलावण्यास मदत होते---उदा. हिवताप. पुरेसा, सुरक्षित व निर्धोक पाणीपुरवठा करणे ही जगाची आजची निकड आहे. हे प्रदूषण घरगुती वाहित मल व औद्योगिक अपशिष्ट यामुळे होते.

ज्याप्रमाणे मानवाच्या आयुष्याशी व सुखाशी निगडीत असलेल्या पाण्याचा विचार केला जातो त्याचप्रमाणे औद्योगिक प्रक्रियांच्या बाबतीतही गरज असलेल्या पाण्याचा विचार करणे आवश्यक आहे. कारखान्यात विविध कारणांकरिता पाण्याचा उपयोग होतो. जवळजवळ सर्व रासायनिक प्रक्रिग्रांमध्ये पाण्याचा उपयोग होतो. औद्योगिक प्रक्रियांमधधे वापरले जाणारे पाण्याचे परिमाण किती असते हे पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होईल:---

(१) एक पिप तेलाचे शुद्धीकरण करण्यासाठी १८ पिपे पाणी आवश्यक असते. .

(२) एक पिप बिअरसाठी १,४०० लिटर पाणी लागते.

*(३) ३५,००० मे. टन साखर दर वर्षाला तयार करणारा कोपरगांव येथील साखर कारखाना प्रतिदिन २७,७२,००० लि. इतके पाणी वापरतो व तेवढ्याच वेळात
२३,७७,००० लि. पाणी औद्योगिक अपशिष्ट म्हणून बाहेर टाकतो.

*(४) महाराष्ट्रातील एक कागद कारखाना दरमहा ७५० मे. टन इतका कागद तयार करतो व त्यासाठी प्रतिदिन ६८,५०,००० लि. इतके पाणी वापरतो. त्यापैकी
६५,०४,५०० लि. पाणी' औद्योगिक अपशिष्ट म्हणून बाहेर पडते.

तेलशुद्धीकरण, मोटारी, प्लास्टिक, काच कारखाना यासारख्या कारखांन्यातही पाण्याचा अमाप वापर होतो. (सारणी १-२ पहा). यात समाधानाची गोष्ट एवढीच को हे सारे पाणी 'Watwe used is water lost' या तत्त्वाप्रमाणे पूर्णतः वापंरले जात नसल्याने योग्य ती उपचारण प्रक्रिया करून पुनर्वापरात आणता येते. अशा या बहुगुणी, बहुउपयोगी पाण्याचे बरेचसे पैलू अभ्यासनीय आहेत.
-------
*११ व्या मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. पु. ज- देवरसांनी दिलेली माहिती
---------

Hits: 69
X

Right Click

No right click