प्रकरण - १ पाण्याचे परिमाण कोष्टके

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन Written by सौ. शुभांगी रानडे

सारणी १.२ : गृहोपयोगो कामांसाठी आवश्यक पाण्याचे परिमाण *

लोकसंख्या पाण्याचे परिमाण लिटर/माणूस/दिन
१०,००० पयंत ७० ते १००
१०,००० ते ५०,००० १०० ते १२५
५०,००० पेक्षा अधिक १२५ ते २००
ज्याठिकाणी घरोधर नळाने पाणीपुरवठा होत नसून एका सार्वजनिक विहिरी पासून हातपंपांच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जातो अशा ग्रामीण विभागात ४० लिटरपेक्षा कमी नसावा.

* या परिमाणांचा विचार करत असताना अगृहोपयोगी (Non Domestic) कामांचा अंतर्भाव करावयाच्या वेळी स्थानिय कारणांचा विचार होणे अगत्याचे आहे. या परिम,णात पिण्याचे पाणी, स्नान, बागकाम', संडासातील प्रक्षाळण इत्यादीचा अंतर्भाव आहे. अग्नीशामक कतव्यासाठी लागणारे पाण्याचे परिमाण खालील सूत्रावरून परिकलित केले जाते. फक्त या सूत्राचा वापर लोकसंख्या जेव्हा ५०,००० हून अधिक असते तेव्हा केला जातो.

पाणी : किलोलिटर/प्रति दिन = १००√P

(P हजारातील लोकसंख्या.) ः

सारणी १.२ (अ) : पाण्याच्या परिमाणांबाबत विविध संस्थांच्या आवश्यक गरजा *

संस्था लिटर प्रति माणूस प्रति दिन

(१) इस्पितळे (धुलाई केंद्रे अंतर्भूत )(अ) १००पेक्षा जास्त खाटा

४५५ प्रति खाट

(१) इस्पितळे (धुलाई केंद्रे अंतर्भूत )(आ) १००पेक्षा कमी खाटा

३४० प्रति खाट

(२) खाणावळी (निवासी) १८० प्रति खाट
(३) उपाहारगृहे ७० प्रति आसन
(४) छात्रावास १३५
(५) परिचारिकांची घरे व वैद्यकीय निवासस्थाने १३५
(६) शाळा व महाविद्यालये १३५
(७) विमानतळ/बंदरे ७०
(८) स्थानके (मेल|एक्सप्रेस|बसेस थांबतात अशी
ठिकाणे)
७०
(९) कचेऱ्या ४५
(१०) कारखाने ४५ जेथे स्नानगृहांची आवश्यकता नाही तेथे हे परिमाण ३० पर्यंत खाली आणता येईल.
(११) चित्रपटगृहे / नाट्यगृहे /नृत्यालये १५

*Manual of Water supply & treatment (1977) या पुस्तकातून.

Hits: 81
X

Right Click

No right click