बालकविता -१
अनुदिनि अनुतापें तापलो रामराया । परम दिन-दयाळा नीरसी मोह-माया ।। ....... रामदास. |
आजीच्या जवळी घड्याळ कसलें आहे चमत्कारिक, देई ठेवुनी तें कुठें अजुनि हें नाही कुणा ठाउक ; .......केशवकुमार. |
आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा ।। सत्यास ठाव देई, ......आनंदराव कृष्णाजी टेकाडे. |
आनंदी आनंद गडे ! इकडे तिकडे चोहिंकडे....बालकवि ठोंबरे. |
आमुचें घर छान शेजारी वाहे ओढा ......माधव ज्युलियन. |
आस ही तुझी फार लागली ।। दे दयानिधे बुध्दि चांगली ।। उंच पाटी पालथी उशाखालीं हात दोन्हीही आडवे कपाळी;.......केशवकुमार. |
उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडलें .......कुसुमाग्रज |
एका कोळियाने एकदां आपूलें । जाळें बांधियेलें उंच जागीं ।। ...... करी आरती घेउनी आर्यबाला |
कशासाठी पोटासाठी- खंडाळयाच्या घाटासाठीं ....... माधव ज्युलियन. |
कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जगासी एकला तो ।। फुटे तरुवर उष्ण-काळ-मासीं । जीवन तयासी कोण घाली ।। .......तुकाराम |
कावळा म्हणे मी काळा । पांढरा शुभ्र तो बगळा । ....... रा. देव |
कुणा आवडतो मोर पिसार्याचा असे कोणाला छंद कोकिळेचा; .....दत्तप्रसन्न कारखानीस. |
गरिब बिचारा माधुकरी, दु:ख तयाला जन्मभरी कडक उन्हानें जीव घाबरे, कपोल सुकले घमें भिजले पायीं चटके तापे डोकें, धांपा टाकीत पळे जरी ......श्रीधर बाळकृष्ण रानडे. |