वनवासी बंधूंचे गीत
कॊण आदि अन कॊण अनादि, आंम्ही भारतवासी हो ।
रक्त आमुचे एक असुनी, शहर गाव वनवासी हो । आम्ही भारतवासी हो ॥ ध्रृ ॥
राजमहलचा मोह सोडुनी दुर्गम रस्त्यावरी चाले ।
मऊ फुलांची शैय्या सोडुनी काट्यावरती पाय पडे ।
चित्रकूट आणि पंचवटीवर वनवासी जग प्रेम करे ।
शबरीची बोरे गोड मानुनी राम फिरे वनवासी हो ।
आम्ही भारतवासी हो ॥ १ ॥
ह्त्तीच्या हौद्यावर चढुनी रणांगणी दुर्गा ही लढी ।
दोन्ही हाती खड्ग घेऊनी शत्रुवरती चाल करी ।
नारायण दल विक्रम त्यांचा अजर अमर होऊन जगी ।
खड्गधारी हे वीर येथले शत्रूंची धुळधाण करी ।
मंगलगढची राणी दुर्गा गिरीजंगलची स्वामी हो ।
आम्ही भारतवासी हो ॥ २ ॥
परचक्राचे वादळ आले क्रूर पाशवी वृत्तीचे ।
वीर शिवाजीच्या शब्दाने तरुण निर्मिले भक्तीचे ।
सह्याद्रीची पुकार ऎकून सागर लाटा उसळी रे ।
मातृभूमीच्या या अभिमाने निर्भयतेचा ऊर भरे ।
छत्रपतींचे स्वराज्य रक्षण शपथ सर्वजण घेती हो ।
आम्ही भारतवासी हो ॥ ३ ॥
उपेक्षितांची सेवा करण्या गिरी जंगलचा मार्ग धरा ।
स्वजनांच्या भावना चेतवुन समरसता निर्माण करा ।
प्रलोभनाना मिटवुन सार्या राष्ट्रशक्ती जागृत करा ।
देश धर्म निष्ठेचा नारा संकटातही अटल रहा ।
भाषा इतक्या, वेश निराळे अंत:करणी एकी हो ।
आम्ही भारतवासी हो ॥ ४ ॥