मिसळीचा चिवडा (डाळमोठ)
साहित्य :- |
एक किलो बटाटे, एक वाटी मूग, एक वाटी मसुरा, एक वाटी चण्याची डाळ, एक वाटी शेंगदाणे, दहा-पंधरा ओल्या मिरच्या, फोडणीचे साहित्य, दोन चमचे जिरे, तळण्याकरिता तूप अग तेल, पादेलोण. |
|
कृती |
चिवडा करण्यापूर्वी मूग, मसुरा व चण्याची डाळ ही धान्ये आधी आठ तास वेगवेगळी भिजत टाकावीत. भिजविताना त्या प्रत्येकात चिमटीभर सोडा घालावा. भिजून झाल्यावर ती धान्ये उपसून फडक्यावर पसरून ठेवावीत. बटाटे धुऊन व सोलून त्याचंा जाडसर कीस करावा. तो कीस पाण्यात धुऊन फडक्यावर पसरावा. नंतर कढईत तळण्याकरिता तूप अगर तेल गरम करत ठेवावे. चांगले तापल्यावर प्रथम बटाट्याचा कीस तळून घ्यावा. नंतर शेंगदाणे, मूग, मसुरा व चण्याची डाळ ही तळून घ्यावीत. तळताना तूप अगर तेल भरपूर तापलेले असावे. मग तुपाची फोडणी करून त्यात ओल्या मिरच्या ठेचून, हिंग व जिरे (पूड करून) घालून त्यावर वरील तळून घातलेले सर्व जिन्नस घालावेत व चवीप्रमाणे मीठ व साखर घालून झाऱ्याने चांगले हलवून मिसळावे. नंतर पातेले खाली उतरवून ठेवावे. हा चिवडा दिसायला सुंदर आणि चविलाही चांगला रूचकर लागतो. खावयास देताना बरोबर लिंबाची फोड द्यावी. (टीप - आवडत असल्यास पादेलोणही घालावे. घालावयाचे असल्यास मीठ व साखर यांचेबरोबर घालावे. पादेलोणचा एक निराळाच असा चांगला स्वाद लागतो. |