मुगाच्या डाळीचा डोसा

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
दोन वाट्या मुगाची डाळ, चार-पाच ओल्या मिरच्या, आले, हवी असल्यास लसूण, मीठ, पाव चमचा हळद.

कृती :

डोसा करण्यापूर्वी चार-पाच तास आधी मुगाची डाळ भिजत घालावी. भिजल्यानंतर तीरगड्यात वाटून घ्यावी. डाळ वाटून होत आल्यावर त्यातच मिरच्या, मीठ, आले व आवडत असल्यास लसूण घालून सर्व पूर्णपणे वाटून घ्यावे. डोसा करण्याच्या वेळी पिठात थोडी हळद टाकावी. बिडाचा तवा तापत ठेवून त्यावर चमचाभर तेल घालून त्यावर तयार केलेले सारखे पळीभर घालावे. व पातळ पसरून त्यावर झाकण ठेवावे. डोसा तयार झाल्यावर काढून घ्यावा व चटणीबरोबर खावयास द्यावा. पीठ तयार करून घेतल्यावर लगेच डोसा करावयास पाहिजे असे नाही. पीठ तसेच सात-आठ तास राहू शकते.
(मुगाच्या डाळीप्रमाणेच चण्याच्या डाळीचेही डोसे होतात. मुगाच्याऐवजी चण्याची डाळ घ्यावी. बाकीचे साहित्य व कृती मुगाच्या डाळीच्या डोशाप्रमाणे)

Hits: 476
X

Right Click

No right click