इडली
साहित्य :- |
दोन वाट्या तांदूळ अगर तांदळाचा रवा, एक वाटी उडीद डाळ |
|
कृती : |
डाळ, तांदूळ वेगवेगळे ४ ते ५ तास भिजत ठेवून नंतर त्यातील पाणी काढून वेगवेगळे वाटणे. वाटताना थोडं थोडं पाणी घालावे. तांदूळ व डाळ बारीक वाटावे. मिक्सरच्या वरच्या झाकणाचे मध्ये छोटं झाकण असेल तर ते काढावे म्हणजे डाळ हलकी होते व इडल्या चांगल्या फुगतात. वाटल्यावर दोन्ंही पीठ एकत्र करून रात्रभर झाकून ठेवणे. सकाळी इडली पात्रात अगर वाट्यांना आतून तेलाचा हात लावून अर्धी वाटी एवढं पीठ भरून इडल्या १५ मिनिटे उकडाव्यात. चटणीबरोबर द्यावी. |