मटार- पॅटीस

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
बटाटे, मटार, ब्रेडच्या दोन - तीन स्लाईसेस, ओले खोबरे, कांदा, लिंबू, ओल्या मिरच्या, मीठ, साखर, ब्रेडचा चुरा अगर तांदळाची पिठी, आले, जिरे, कोथिंबीर, तेल, सोडा

कृती :
बटाटे वाफवून सोलून घ्यावेत. मळून त्याचा गोळा करावा. ब्रेडच्या स्लाईसेस पाण्यात भिजवून घेवून व कुस्करून बटाट्याच्या गोळयात घालाव्या. चवीपुरते मीठ घालावे. बटाट्याच्या गोळा तीन वाट्या झाल्यास मटाराचे दाणे दोन वाट्या घ्यावेत. दाणे जरा ठेचून घेवून तेलावर टाकावेत व चिमटीभर सोडा घालून ऐक - दोन वाफा आण्याव्यात. ओल्या मिरच्या, आले, जिरे व चवीप्रमाणे मीठ असे सर्व ऐकत्र वाठून शिजलेल्या मटारामध्ये घालावे. तसेच ओले खोबरे किंचित घाटून कांदा बारीक चिरून व कोथिंबीर चिरून घालावी चवीला साखर घालावीव लिंबू पिळावे. आवडत असल्यास लसूणही वाटून घालावी. याप्रमाणे सारण तयार करून घ्यावे बटाट्याच्या वाटलेल्या गोळयाच्या पापड्या तयार करुन त्यात सारण भरावे. व पापडीचे तोंड बंद करून त्यास गोल व पेढ्यासारखा चपटा आकार द्यावा. नंतर त्या पॅटीसला ब्रेडचा चुरा अगर तांदळाची पिठी सगळीकडून लावून घ्यावी व ते पॅटीस तव्यावर ठेवून चमचा- चमचा तेल घालून तांबूस होईपर्यंत परतावे.
Hits: 410
X

Right Click

No right click