गाजराचा हलवा (क्रीमचा)

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
एक किलो दिल्ली गाजर धुऊन, खरवडून, किसून, एक लिटर साईसकट दूध, पाऊण कप साखर, वेलदोड्याची पूड जाडसर एक चमचा, काजू संबंध, बदाम, अर्धा कप क्रीम, दोन टेबल स्पून साजूक तूप.

कृती :
गाजराचा किस नुसताच परता. पाणी कमी झाल्यावर दूध घाला. दूध आटत आल्यावर थोडी वेलदोडे पूड व साखर घाला. घट्ट झाल्यावर क्रीम घाला. शेवटी तूप घालून परता. काजू व सोललेले बदाम, वेलदोडे पूड घाला. गरम वाढा.
Hits: 416
X

Right Click

No right click