अरे अरे ज्ञाना - संत ज्ञानेश्वर

Parent Category: मराठी संस्कृती Category: भक्तिपरंपरा Written by सौ. शुभांगी रानडे

अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।
तुझें तुज ध्यान कळों आले ॥१॥

तुझा तूंचि देव तुझा तूंच भाव ।
फिटला संदेह अन्यतत्वी ॥२॥

मुरडूनियां मन उपजलासी चित्तें ।
कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥

दीपकीं दीपक मावळल्या ज्योती ।
घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥

वृत्तीची निवृत्ति अपणांसकट ।
अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥

निवृत्ति परमानुभव नेमा ।
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥

Hits: 477
X

Right Click

No right click