अधिक देखणें - संत ज्ञानेश्वर
अधिक देखणें तरी निरंजन पाहणे । योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥
देहबळी देऊनी साधिलें म्यां साधनीं । तेणे समाधान मज जोडलें वो माये ॥२॥
अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें । सकळ देखिलें आत्मसवरूप वो माये ॥३॥
चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला । तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥
पुरे पुरे आतां प्रपंचा पाहणें । निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥
ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू । विठ्ठलीं निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥
Hits: 345