आश्विन
विजयादशमी (दसरा) | |
राक्षसांचा राजा दुर्गासूर यानं तप करून ब्रह्मदेवाकडून असा वर मिळवला की, `त्रिभुवनात तुला कोणीही वीर पुरूष जिंकू शकणार नाही. या वरामुळे दुर्गासुर एवढा प्रबल झाला की, त्याने इंद्र, चंद्र, वरूण, व यम यांना बंदी केले.' अखेर दुर्गासुराच्या वधासाठी पार्वतीने वेगळे रूप घेतलं व त्या रूपाला `विजया' असे नांव दिले. तिला विविध शस्त्रांनी सज्ज केले. शंकराने आपला त्रिशुळ दिला. विष्णुने आपले सुदर्शन चक्र व कवच दिले. अशाप्रकारे प्रत्येक देवाने आपली वेगवेगळी शस्त्रे दिली. |
|
ही सर्व शस्त्रे पेलण्यासाठी पार्वतीने आठ बाहू धारण केले. या अष्टभुजा धारण केलेल्या पार्वतीने नऊ दिवस लढून दहाव्या दिवशी दुर्गासूराचा नाश केला. सगळीकडे आनंद झाला. तो आनंद प्रकट करण्याकरिता नवरात्र व दसरा साजरा करतात. |
|
| |
कोजागिरी पौर्णिमा | |
आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी रात्री इंद्राची पूजा करतात. पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वी वर उतरते व `को जागर्ति'? कोण जागं आहे? असा प्रश्न विचारते जो जागा असेल त्याला जी धनधान्य देते. यावरून कोजागिरी पौर्णिमा असे नांव पडले. आश्विन महिन्यात पावसाळा संपतो. त्यामुळे आकाश निरभ्र असते व स्वच्छ चांदण असते अशा चांदण्यारात्री इष्टमित्रांसह मौजमजा करण्याच्या दृष्टीने हा उत्सव साजरा करतात. राजस्थान मध्ये स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र धारण करून चांदीचे अलंकार घालण्याची प्रथा आहे.
|