सूर्योदय

Parent Category: भाषांतर Category: संस्कृत Written by सौ. शुभांगी रानडे

(मराठी दुसरीतील कविता ‘सूर्योदय’चा संस्कृत अनुवाद)

सूर्योदय

बघ आई आकाशात सूर्य हा आला
पांघरुनि अंगावरी भरजरी शेला ॥ . . . १

निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी ।
मोतियांच्या लावियेल्या आत झालरी ॥ . . . २

केशराचे घातले हे सडे भूवरी ।
त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी ॥ . . . ३

डोंगराच्या आडून हा डोकावि हळू
आणि लागे गुलाबाची फुले उधळू ॥ . . . ४

मंद वारा जागवितो सार्‍या जगाला
म्हणतसे उठा उठा मित्र हा आला ॥ . . . ५
-------------

सूर्योदयः।

पश्य पश्य अयि अम्ब प्रभाते रविरागच्छति आकाशे ।
पीतं वस्त्रं सुवर्णभरितं धारयति यः स्वस्याङ्गे ॥ . . . १

सुवर्णवर्णस्तंभशोभामण्डितनीलप्रासादे ।
नयनमनोहरमौक्तिकमाला जवनिकेव तु तन्मध्ये ॥ . . . २

संमार्जनकाश्मीरवर्तते अखिलचराचरभूपृष्ठे ।
तस्योपरितः सवितागच्छति सुभगतया नभमण्डले ॥ . . . ३

गिरिपृष्ठतः शनैः शनैः रविदर्शनमस्ति दिने दिने ।
जपाकुसुमवृष्टिरिव भवति च वसुधायां गगने सदने ॥ . . . ४

जागरयति अति मन्दं मन्दं शीतलसमीरः हे वसुधे ।
सकललोकहितरक्षणार्थं मित्रस्वागतं कार्यं ते ॥ . . . ५


--- सौ. शुभांगी सु. रानडे

--------------

Hits: 148
X

Right Click

No right click