बालकविता - ५
पोटासाठीं भटकत जरी दूरदेशीं फिरेन, मी राजाच्या संदनिं अथवा घोर रानीं शिरेन;......वासुदेव वामनशास्त्री खरे. |
प्रभात झाली रवी उदेला ऊठ उशिर झाला; प्रेमळ भावे सरळ मनानें वंदिं जगत्पाला.......दत्तात्रय कोंडो घाटे. |
बरें सत्य बोला यथातथ्य चाला, बहू मानिती लोक येणें तुम्हांला.......रामदास. |
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको संसारामंधि ऐस आपला, उगाच भटकत फिरूं नको......अनंतफंदी. |
बोल बाई बोल ग तुझ्या बोलांचे काय वाणं मोल ग......बालकवि ठोंबरे |
मज दीनेची, कींव येउं द्या कांहीं घाला हो भिक्षा माई !......ग. ल. ठोकळ. |
मरणांत खरोखर जग जगतें; अधिं मरण, अमरपण ये मग तें......भा. रा. तांबे. |
मिळे चारा चिमणीस खावयाला, गोड पेरु मिळतात पोपटाला;...... |
या बाई या, बघा बघा कशि माझि बसलि बया.......दत्तात्रय कोंडो घाटे. |
रानपांखरा, रोज सकाळी येसी माझ्या घरा गाणें गाउन मला उठविशी मित्र जिवाचा खरा. ......गोपीनाथ. |
लतांनों ! सांगुं का तुम्हां, उद्यां श्रीराम येणार ! वनाला सर्व ह्या आतां, खरा आनंद होणार !.....वा. गो. मायदेव. |
वनीं विलसती बहू विविध वृक्ष चोंहींकडे, तयांत मज चंदनासम न एकही सांपडे ......कृष्णशास्त्री चिपळूणकर.. |
श्रुतेंचि कीं श्रोत्र, न कुंडलानें दानेंचि की पाणि, न कंकणानें ....वामन पंडित. |
सुंदर मी होणार, आतां सुंदर मी होणार ! सुंदर मी होणार । हो। मरणानें जगणार. ......गोविंद. |
अबलख वारुवरी बैसुनी येतो हे पाटिल भरजरी शिरीं खुले मंदिल......ग. ह. पाटील. |
असतिल तेथें जिकडे तिकडे विखरुन पडलीं फुलें असतिल पक्षी झाडांवरती गोड गात बैसले ......ग. ल. ठोकळ. |