जो स्वत: दानधर्म करतो आणि दुसऱ्यांनीही करावा असे इच्छितो तो सात्विक. |
जो लवकर रागावत नाही पण शांत होतो, तो सात्विक. |
जो कोणी, तुझे ते तुझे आणि माझे तेही तुझे असे म्हणतो तो सात्विक. |
जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दु:खही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो. |
सुखदु:खाच्या लंपडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे. |
व्देषाला सहनुभूतीने आणि निष्कपटतेने जिंका. |
माणूस शक्तिमान असल्यास इतर माणसे त्याला वश होतात व तो जर शक्तिमान नसला तर ते त्याचे शत्रू होतात. |
सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृती होय. |
कोणतीही वस्तु चांगली वा वाईट नसते. फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात. |
मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा. गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात मन गुंतवणं व्यर्थ होय. |
मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दंवबिन्दू होऊन एखाद्या तहानलेल्याची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ होय. |
स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो. |
खऱ्याला केव्हाही मरण नाही नि खोट्याला शंती नाही. |
बुध्दीने कळते पण कृतीशिवाय वळत नाही. |
चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे. |
लोक जितके हुशार आणि कारागीर, तितक्या कृत्रिम गोष्टी जास्त. |
सुवचन श्रवणाने शहाणपण तर दुर्वचन बोलण्याने पश्चाताप करण्याची पण पाळी येते. |
तारूण्य म्हणजे चुका, प्रौढत्व म्हणजे लढा आणि वृध्दत्व म्हणजे पश्चाताप. |
शुध्द भक्ती हे सोंग नसून मन सुधारण्याचा तो एक मार्ग आहे. |
नियम अगदी थोडा असावा, पण तो प्राणपलीकडे जपावा. |
हक्कासाठी झगडण्यापेक्षा कतर्व्याशी प्रामाणिक राहा. |
जो लवकर रागावतो व लवकर शांत होतो, त्यास हानी कमी व लाभ अधिक. |
जो द्रव्य वाढवितो तो काळजी वाढवतो, परंतु जो विद्या वाढवितो, तो ज्ञान वाढवतो. |
अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम. |
बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय. |
माणसे जन्माला येता पण माणुसकी निर्माण करावी लागते. |
मोहपाशमुक्त झाल्यानेच मनुष्याला देवत्व प्राप्त होते. |
वासना मोकाट सुटली तर ती स्वत:च स्वत:ची राखरांगोळी करून टाकणारी ज्वाला बनते. |