मराठी उद्योग संस्था

Parent Category: मराठी उद्योग Category: उद्योजक आणि व्यावसायिक Written by सौ. शुभांगी रानडे

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड कॉमर्स, मराठी व्यापारी मित्र मंडळ, सॅटर्डे क्लब, मराठी इंटरनॅशनल क्लब, मराठी बिझनेस क्लब, उद्योग मिशन, असोसिएशन फॉर इंडस्ट्रीज इन महाराष्ट्र यासारख्या विविध उद्योजकीय संस्था संघटना मराठी उद्योजकतेच्या वाढीसाठी कार्यरत आहेत.
मराठी उद्योजकांची माहिती संकलन करण्याचे कार्य उद्योगमिशन करत आहे. आजमितीस त्यांच्याकडे साडेबारा लाख मराठी उद्योजकांच्या माहितीचा साठा आहे. हे उद्योजक लघु- मध्यम या स्वरुपातले असून विविध प्रकारची सेवा पुरविणाऱ्या उद्योजकांची संख्या यामध्ये लक्षणीय आहे. यातील बहुतांश उद्योजक हे पहिल्या पिढीतील आहे.
व्यवसायामध्ये नेटवर्किंग किती महत्वाचे असते हे मराठी इंटरनॅशनल क्लब आणि मराठी बिझनेस क्लबने दाखवून दिले. दर आठवड्याला इतर लोक सकाळी साखर झोपेत असताना मराठी माणसांना उद्योगवाढीसाठी एकत्र आणण्याचा या दोघांचा उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल.
संदर्भ - प्रमोद सावंत - मराठी उद्योगाचे पाऊल पडती पुढे (https://pramodsawant.wordpress.com/)

Hits: 144
X

Right Click

No right click