भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञान विकास

Parent Category: मराठी उद्योग Category: व्यवसाय
Written by सौ. शुभांगी रानडे

माणसा माणसांत अनेक पद्धतीने संपर्क साधला जातो त्यामधे द्क् आणि श्वाव्य पद्धती सर्वोच्च स्थानावर आहे. सध्या माणूस व मशीन यांच्या दरम्यानचा संपर्क माणसाच्या सोयीपेक्षा मशीनच्या सोयीवर अधिक अवलंबून आहे. माऊस तसेच कीबोर्ड मुख्य इनपुट सांकेतिक भाषा आहे तसेच व्हिज्युअल प्रदर्शन युनिट मुख्य आऊटपुट सांकेतिक भाषा आहे. अशा प्रकारच्या इंटरफेसच्या वापरासाठी खास कौशल्याची तसेच मानसिक अभिवृत्तीची आवश्यकता असते, जे अनेकांकडे नसते. म्हणून परस्पर्रांमध्ये संपर्क प्रस्थापित करणाऱ्या या मशीन केंद्रीत मोडचे मानव-केंद्रित इंटरफेसमध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे, ज्यामुळे कॉम्प्युटर सामर्थ्याचा सगळयांनाच लाभ मिळेल. खरं म्हणजे माहिती कळण्यासाठी ती डोळयासमीर प्रत्यक्ष दिसल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो, परंतू माहिती प्रत्यक्ष वाणीवाटे सांगण्याला सर्वाधिक प्राधन्य दिलं जातं आणि ते सोपही असतं. कॉम्प्युटर आणि दूरसंदेश दळणवळण प्रणाली एकत्रित येण्यामुळे शाब्दिक दळणवळण आज अधिक प्रभावी ठरलं आहे, ज्यामुळे लोकांना, दूरवर असलेल्या कॉम्प्युटर वरून माहिती सहजपणे मिळविता येते.

शाब्दिक दळणवळणात नैसर्गिक भाषांचा सहभाग असल्यामुळे, माहिती तंत्रज्ञानात भाषा शास्त्राला विशेष स्थान प्राप्त झालं आहे. म्हणुनच कॉम्प्युटरसाठी मानव केंद्रित इंटरफेस ही आजच्या काळाची गरज आहे मानवाला भाषेची अनोखी देणगी मिळाली आहे ज्यामुळे तो माहिती, विचार आणि कल्पनांची आपापसात सहजगत्या देवाणघेवाण करतो. नैसर्गिक भाषांचा वापर करून माणूस आणि मशीन यांच्यामध्ये परस्पर संपर्क प्रस्थापित करण्यात, मानवी भाषा तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंचा समावेश वाणी संकलन, मान्यता, आणि वाणी समजणे स्क्रिप्ट, मशीन भाषांतर आहे,: पाठ सृजन, वाणी आणि कर्सिव्ह स्क्रिप्टचे संस्लेषण, मशीन बरोबर संपर्क स्थापित करण्यासाठी लिखित आणि बोली अशी दोन्ही रूपे उपयुक्त आहेत.

कॉम्प्युटरवर भारतीय भाषांमधे काम करण्याची सोय गेल्या दोन दशकांपासून असून त्यामध्ये, डेटा प्रक्रिया, शब्द प्रक्रिया, डेस्कटॉप पब्लिशिंग इ. गाष्टींचा समावेश आहे.

माहिती तंत्रज्ञान विभागाने, कोणत्याही भाषेच्या अडथळ्याशिवाय बहुभाषिय ज्ञानाच्या स्त्रोताची निर्मिती करून ते उपलब्ध होण्यासाठी तसच त्यांचे संकलन करून, वापरकर्त्यांसाठी नाविन्यपूर्ण उप्तादन विकसित करण्यासाठी आणि त्याची सेवा उपलब्ध करून देण्याकरता माहिती प्रक्रिया साधने आणि तंत्रज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञान विकास म्हणजेच टी डी आय एल ने कार्यक्रमाची सुरवात केली आहे, कॉर्पोरा आणि डिक्शनरी यासारखे भाषा शास्त्र स्रोत विकसित करणाऱ्या प्रकल्पांना निधीही पुरवण्यात आला आहे, तसेच फॉन्ट, टेक्स्ट एडिटर, स्पेल चेकर, ओ सी आर आणि टेक्स्ट टू स्पीच यासारखी मूलभूत माहिती प्रक्रिया साधनेही विकसित करण्यात आली आहेत.

भारतीय देशात भाषा तंत्रज्ञान उप्तादने आणि सेवा विकसित करण्यासाठी खाजगी, सार्वजनिक तसेच सरकारी अशा विविध पातळयांवर प्रयत्न केले गेले आहेत. स्रोत तसच कॉईलनेट केंद्रांतर्फे विकसित करण्यात आलेली भाषा तंत्रज्ञाने आणि साधने लौकरात लौकर वापरात आणली गेली पाहीजे ज्यामुळे त्यावरील प्रतिक्रिया उपलब्ध होतील आणि उप्तादनासाठी ती उपलब्ध करून देता येतील संशोधन आणि विकासासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा संपूर्ण समाजावर परिणाम दिसून येणं आवश्यक आहे, कारण हे विकासात्मक प्रयत्न प्रयोग शाळापुरतेच मर्यादीत न रहाता ते अधिकाधिक लोकांपर्यत पोहचले पाहीजेत, ज्यामुळे लोकांच्या (वापरकर्त्यांच्या) प्रतिक्रिया आणि अनुभव मिळून त्यात पुढे आणखी सुधारणा घडवून आणता येतील.

सरकारने पुढील उप्तादन आणि त्यावरील उपाय आगामी एक वर्षात सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करूण देण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे:

सर्व भारतीय भाषांमध्येमोफत फॉन्टस् (TTF आणि OFT) वर्ड प्रोसेसर यासाठी उचलण्यात आलेले पहिले पाऊल म्हणजे प्रकाशन उद्योगाशी संपर्क साधून तमिळ आणि हिंदी भाषेतील ट्र. टाईप फॉन्ट (TTF) सार्वजनिक ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यासाठी निवडण्यात आले आहेत. TTF फॉन्टस् विंडोज 95/ विंडोज 98/ विंडोज NT प्लॅटफॉर्म या प्रणालींमध्ये मोठया प्रमाणात वापरले जात आहेत. विंडोज 2000/XP/2003 आणि लिनक्स प्लॅटफॉर्म यासारख्या प्रणालींसाठी ओ टी एफ ( ओपन टाईप फॉन्ट) सादर करण्यात येत आहेत. ड्रा आशातरहेचा पहिलाच प्रयत्न असून, बहुतेक वर्ड प्रोसेसर (अस्तित्वात असलेले व नवीन) या फॉन्टसचा वापर करू शकतील यामुळे तमिळ नेट/तमिळ 99 आणि टाईपरायटर कीबोर्डस् वापरकर्त्यांना डेटा एन्ट्रीसाठी फॉन्ट उपलब्ध होतील.

माहिती गोळा करणे, पुन्हा प्राप्त करणे, आणि अंकियकरणासाठी सर्व भारतीय भाषांमध्ये प्रकाशिक अक्षर ओळख (ORC) ओ आर सी मुळे स्कॅन करण्यात आलेली प्रतिकृतीचे (स्कँनरचा वापर करून छापलेल्या पानाचे स्कँनिंग) संपादित आवृत्तीत रुपांतर करण्यात येते. त्यामुळे त्याचा आवश्यक त्या सुधारणा आणि वापर करता येतो. याचा प्रकाशन व्यवसायाला सर्वाधिक लाभ मिळणार आहे कारण या साफ्टवेअरचा वापर करून, ते पुनर्मुद्रण करून नवीन प्रती छापू शकतील.

रेल्वे माहिती, आरोग्य सेवा, कृषि आपदा व्यवस्थापन आणि इतर सार्वजनिक सोयींसाठी वाणी इंटरफेस प्रणाली यामुळे बहुसंख्य लोक भारतीय भाषांमध्ये अद्ययावत प्रणालीचा लाभ घेउ शाकतील.मानवी आवाज ओळखून त्याचे, माहिती समजून घेण्यासाठी लिखित रुपात रुपांतर करण्यासाठी बोलणे ओळखणाऱ्या इंजिनाचा वापर करण्यासाठी इंटरफेस प्रणाली उपयोगात आणली जाऊ शकते. टेक्स टू स्पीचचा उपयोग दृष्टीहीन लोकांसाठी माहिती मिळविण्यासाठी टेक्स्ट वापरण्यासाठी केला जाऊ शकतो.

ब्राउजर, सर्च इंजिन, तसेच ई-मेल यासारखी इंटरनेट एक्सेस उपकरणे भारतीय भाषांसाठी वापरून भारतीय भाषेत ई-मेल पाठवणे शक्य होईल. तसेच सर्च इंजिन भारतीय भाषात माहिती शोधण्यास मदत करेल त्याच बरोबर कोणत्याही एखाद्या भारतीय भाषेत चौकशी माहिती देखील उपलब्ध करून देईल.

इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमधे ऑनलाईन भाषांतर सेवा उपकरण. यामुळे इंग्रजी भाषेत तसच आपल्या लक्षित भारतीय भाषेत उपलब्ध माहितीचे भाषांतर करून घेण्यास मदत मिळेल.

उप्तादन/सेवा ऑनलईन हेल्प डेस्कसह टी डी आय एल डेटा सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील.
पुढील माध्यमांतून संशोधन, उत्पादन, नियोजन यांना चालना देण्यासाठी सरकारपुढे टी डी आय एल-डी सी करता (भाषा तंत्रज्ञान उपयोगिता चॅनल) कालबद्ध मोहीम ओह.

१. विकसित तंत्रज्ञानाला बाजारात उपलब्ध करणे

२. उत्पादन तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा दर्जा वाढविणे किंवा त्यावर संशोधन करणे

३. आवश्यकतेनुसार नविन तंत्रज्ञानाचा विकास करणे

वरील गोष्टी प्राप्त करण्यासाठी पुठील उपाययोजना करण्यात येत आहेत:

टी डी आय एल डेटा केंद्रांच्या माध्यमातून भाषा तंत्रज्ञान/साधनांचे नियोजन बद्ध वितरण
विकसित साधने, तंत्रज्ञान, उप्तादन आणि सेवांचे अधिगृहण
उपलब्ध साधने आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय भाषेत सरकारने केलेल्या प्रयत्नांविषयी जागरूकता निर्माण करणे, प्रसार करणे
वापरकर्त्याला साधने, उपयोगिता, उप्तादने निःशुल्क स्वरुपात
भाषा तंत्रज्ञानात खाजगी-सार्वजनिक भागिदारीला चालना देणे.
खास वापरात येणाऱ्या क्षेत्रांमधे मोहीमेची सुरवात करणे.

स्त्रोत : http://ildc.in/Marathi/mintroduction.html#top

ग्राहक वा नोकर न बनता निर्माते वा मालक व्हा

Parent Category: मराठी उद्योग Category: व्यवसाय
Written by सौ. शुभांगी रानडे

कोरोना प्रादुर्भावामुले भारताच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरा बसला असून आंतरराष्ट्रीय तणावाच्या स्थितीमुळे यासमस्यात दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. भारताच्या प्रचंड लोकसंख्येमुळे आधीच सतावणा-या  गरिबी, बेरोजगारी, पर्यावरण –हास, सत्तेसाठी चालणारे राजकारण अशा अनेक समस्यांनी शासनाला बेजार केले आहे. त्यातच आता या नव्या आणि आवघड परिस्थितीने  शासनाच्या विकास योजना ठप्प झाल्या असून समाजाच्या दैनंदिन गरजा भागविण्यातही अडचणी येत आहेत.
अशावेळी नोकरी मिळेल की नाही, असली तरी टिकेल की नाही, आपल्या भावी पिढीचे काय होणार  हे प्रश्न आज प्रत्येकाला भेडसावत आहेत. यावेळी सुस्थितीत  असणा-या लोकांवर फार मोठी जबाबदारी पडली असून त्यांनी धाडस दाखवून समाजाला नवे नेतृत्व देण्याची व त्यातून देशसेवा करण्याची आवश्यकता आहे.


भारताला प्रचंड लोकसंख्या हे संकट वाटत असले तरी अमेरिका आणि इतर प्रगत राष्ट्रांना फार मोठी ग्राहक पेठ म्हणून भारताविषयी आकर्षण वाटते. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या मालाची व सेवासुविधांची विक्री करण्यासाठी भारतातील कानाकोप-यात आपले जेळे पसरवीत आहेत. तसेच खर्चिक, आकर्षक जाहिरातींनी जनतेला भुरळ पाडत आहेत. बेरोजगार युवकांना लठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांना या वस्तू व सेवांच्या विक्रीसाठी आपल्या जाळ्यात ओढत आहेत.

प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरील कोणत्याही समस्या सोडविण्यास आवश्यक असणा-या तज्ज्ञांची व शारिरीक श्रमाची कामे करणा-या लोकांची वानवा आहे. परिणामी याच सेवा परदेशी कंपनीकडून करवून घेण्याकडे शासकीय निमशासकीय संस्थांची मनोवृत्ती बनली आहे.मोठ्या शहरातील अनेक समस्यांनी ग्रस्त व खर्चिक जीवनशैलीतील दिखावू सुखाकडे आजचा युवकवर्ग आकर्षित होत आहे. गुणवत्तेच्या आवाजवी आग्रहामुळे स्वदेशी उत्पादनापेक्षा परदेशी वस्तूंना लोक पसंती देत आहेत. इंटरनेटवरून व्यापार सुरू झाल्याने स्थानिक दुकानदारीवर संकट आले आहे.

या सर्वांवर मात करून भारत स्वयंपूर्ण व सामर्थ्यवान बनवायचा असेल तर आपली मानसिकता बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. मी नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योजक बनेन, निवृत्त असलो तर शेअर मार्केटच्या मागे लागून पऐसे इतरांना वापरायला देण्यापेक्षा स्वतः मालक होऊन दोन चार नवयुवकांना उद्योजक बनविण्यास मदत करेन. शक्यतो स्थनिक उत्पादनांचा वापर करेन.

सध्याच्या शैक्षणिक संस्थांनी नोकरदार बनविण्याच्या उद्दीष्टात बदल करून स्वयंउद्योजक बनविण्याचे व पदवीधरांना वा-यावर न सोडता त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यास  सर्वतोपरी साहाय्य करण्याचे  उद्दीष्ट अंगिकारले तर भारताला प्रचंड लोकसंख्या हे संकट न वाटता ते एक सामर्थ्याचे लक्षण ठरेल. ज्ञानदीप फौंडेशन या कार्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांत प्रबोधन प्रकल्प राबमिणार आहे. आपणा सर्वांचे या उपक्रमास सक्रीय सहकार्य मिळेल असा मला विश्वास वाटतो. – डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली.


भारतीय भाषा आणि भाषांतर व्यवसायास नवसंजीवनी

Parent Category: मराठी उद्योग Category: व्यवसाय
Written by सौ. शुभांगी रानडे
 नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण घेण्याची तसेच पुढील शिक्षणासाठीही मातृभाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याची सोय सर्व शिक्षणसंस्थांना करावी लागणार आहे.

आत्मनिर्भर भारताच्या विकासासाठी आणि समाजाच्या तळागाळात शिक्षणाची गंगा पोहोचण्यासाठी मातृभाषेतील शिक्षण अपरिहार्य आहे. ज्ञानदीपने इ. स. २००० पासूनच यासाठी प्रयत्न सुरू केले. मराठी तसेच संस्कृत भाषेतील वेबसाईट, सॉफ्टवेअर  आणि मोबाईल सुविधा निर्माण केल्या. भाषा, स्थानिक माहिती याबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान यातही मराठीचा आवर्जून वापर केला.

मात्र अजूनही महाराष्ट्रात मराठीला शिक्षणक्षेत्रात गौण स्थान  राहिले आहे.मराठीत शिकलेल्या विद्यार्थ्यांना कमीपणाची वागणूक समाजाकडून दिली जाते. कोणत्याही शहराची वा गावाची सर्व माहिती मराठीत  उपलब्ध नाही ही खेदाची गोष्ट आहे.

मराठी भाषेत असलेले ज्ञानभांडार इतर भाषांत भाषांतर करून ते देशभरात व सर्व जगभर पोहोचविणे आणि इंग्रजी भाषेतील ज्ञान मराठीत आणणे या दोन्ही क्षेत्रात सरवसामान्य जनतेलाही घरबसल्या व्यवसायाची आणि पैसे मिळविण्याची फार मोठी संधी या धोरणामुळे निर्माण झाली आहे.

भाषांतराचा हा व्यवसाय भविष्यात फार मोठ्या प्रमाणावर वाढणार असून ज्ञानदीप फौंडेशन यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार करून याचा प्रसार करणार आहे.

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणसंस्थांनी यात पुढाकार घेऊन ज्ञानदीपच्या या अभियानात सक्रीय सहभागी व्हवे असे आवाहन मी करीत आहे. - सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.

बहुगुणी व शिकायला सोपी पायथॉन भाषा शिका व संगणकतज्ज्ञ बना.

Parent Category: मराठी उद्योग Category: व्यवसाय
Written by सौ. शुभांगी रानडे
ज्ञानदीपमध्ये वेबसाईट, सॉफ्टवेअर आणि एपसाठी लागणा-या सर्व भाषा शिकण्याची सोय असली तरी आता लहानांपासून थोरांपर्यंत, कोणालाही सहज शिकता येणा-या पायथॉन या आधुनिक भाषेचे अद्ययावत शिक्षण देण्याची सोय करण्यात आली आहे.


 पायथॉनची वैशिष्ठ्ये


१. पायथॉन सध्या सर्वात जास्त वापरली जाणारी आणि C प्रमाणे कॉम्प्युटर हार्डवेअरशी निगडीत असणारी प्रोग्रॅमिंग भाषा आहे.

२. पायथॉनमध्ये आपण C# वा जावाप्रमाणे  ऑब्जेक्ट-ओरिएंटेड किंवा C प्रमाणे प्रोसीजर पद्धतीने  प्रोग्रामिंग करू शकतो.

३. पायथॉन प्रोग्राम्स जावासारख्या इतर प्रोग्रामिंग भाषांपेक्षा कितीतरी लहान असतात. सहज वाचता येतात.

४.  गुगल, अमेझॉन, फेसबुक, इन्स्टाग्राम, ड्रॉपबॉक्स, उबर… इत्यादी जवळजवळ सर्व तंत्रज्ञ कंपन्या  आपल्या वेबसाईटसाठी प्रामुख्याने पायथॉन भाषा वापरतात.

५.  पायथॉनमध्ये  सर्वात मोठी सुविधा म्हणजे तयार प्रोग्रॅम्सची लायब्ररी. त्यांचा वापर करून अगदी थोड्या ओळीत अवघड क्लिष्ट गणिती प्रक्रिया, भौमितिक आकृत्या वा ग्राफ काढता येतात.

६. लहान मुलांसाठी छोटे मनोरंजक खेळ व व्हिडिओ बनविण्यासाठी लागणारी स्क्रॅच, टर्टल ग्राफिक्स व इतर अशीच सॉफ्टवेअर पायथॉन भाषाच वापरतात.

७. इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून ते यंत्रमानवापर्यंत साधनांना संचालित करण्यासाठी पायथॉनमध्येच प्रोग्रॅम लिहावे पागतात.

८. कॅमेराद्वारे चित्र वा प्रतिमा ओळखणे, फिंगर प्रिंटींग, बार कोड स्कॅनिंग, छापील पानावरून टेक्स्ट तयार करणे इत्यादी सरव गोष्टींसाठी पायथॉनचाच वापर केला जातो.



स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठी आणि  डिजिटल भारताच्या उभारणीत सक्रीय सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने पायथॉन शिकणे आवश्यक आहे.

ज्ञानदीपने लहान मुलांपासून ते उच्चशिक्षित विद्यार्थ्यांपर्यंत पायथॉनचे विविध स्तरावरील शिक्षण देण्यासाठी अध्यासक्रम तयार केले असून अनेक शिक्षकांमार्फत सर्वांपर्यंत ते पोहोचविण्याचे उद्धीष्ट ठेवले आहे. लवकरच

ऑनलाईन पद्धतीनेहीया भाषेचे समग्र शिक्षण ज्ञानदीपतर्फे दिले जाणार आहे,

शिक्षणसंस्थांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन ज्ञानदीप सर्वांना करीत आहे.

X

Right Click

No right click