आईसक्रीम
साहित्य :- |
एक लिटर दूध, पाव किलो साखर, केशर, बदाम, वेलदोडे, दोन चमचे कस्टर्ड पावडर अगर आईसक्रीम पावडर. |
|
कृती : |
मलईसकट दूध घ्यावे. ते तापवून त्यात साखर घालून थंड करून घ्यावे. नंतर केशराची पूड, बदामाचे काप व वेलदोड्यांची पूड घालून ते चांगले ढवळावे. नंतर आईसक्रीम पॉट घेऊन त्याच्या मधल्या भांड्यात वरीलप्रमाणे तयार केलेले दूध घालावे व भांडे जागेवर बसवून त्याच्या भोवताली बर्फाचे खडे व मधूनमधून मिठाचे खडे घालून यंत्र हाताने फिरवावे. पुन्हा मधूनमधून लागेल तसा बर्फ व मिठाचे खडे घालावेत. आईसक्रीम होत आल्यावर यंत्र फिरवावयास जड लागू लागते. आईसक्रीम झाल्यावर यंत्र फिरवणे थांबवावे आईसक्रीममध्ये दुधात आंब्याचा रस अगर फोडी अगर संत्रे, अननस, चेरी वगैरे फळांच्या फोडी घालतात. तसेच दुधात आवडत असेल तो इसेन्स व खाण्याचा रंगही घालतात. त्याचप्रमाणे दुधाला कस्टर्ड पावडर अगर आईसक्रीम पावडरही लावतात. त्यामुळेही आईसक्रीम चांगले लागते.
|