गुळाची पोळी
साहित्य :- |
५०० ग्रॅम पिवळया रंगाचा गूळ, अर्धी वाटी डाळीचे पीठ, अर्धी वाटी खसखस पूड, १ टेस्पून सुक्या सोबऱ्याचा कीस, ७ ते ८ वेलदोड्यांची पूड, २ वाट्या कणीक, १ वाटी डाळीचे पीठ, अर्धा चमचा मीठ व तेलाचे मोहन |
|
कृती : |
कणीक, मैदा, डाळीचे पीठ, मीठ एकत्र करावे. त्यात जरा जास्त तेलाचे मोहन घालून नेहमी पोळयांसाठी पीठ भिजवतो तसे भिजवून ठेवावे. गूळ बारीक चिरून घ्यावा. नंतर कपड्यावर ठेवून वरवंट्याने ठेचून घ्यावा, म्हणजे गूळ मऊ होईल. तीळ, खसखस, खोेबरे भाजून घ्यावे व त्याची पूड करावी. डाळीचे पीठ थोड्या तुपावर भाजून घ्यावे. नंतर सर्व एकत्र करावे. त्यात वालापेक्षा जरा जास्त खायचा चुना घालावा व गूळ चांगला मळून घ्यावा. कणकेच्या दोन लाट्या जरा लाटून घ्याव्यात. त्यावर गुळाची एक मोठी गोळी जरा चपटी करून घालावी. कडा दाबून घ्याव्यात व पोळी लाटावी. लाटताना पोळी उलटानी व लाटावी. नंतर सपाट तव्यावर पोळी भाजावी. तव्यावरची पिठी व चिकटलेला गूळ उलथन्याने काढून तवा ओल्या कपडाने पुसून नंतर दुसरी पोळी तव्यावर टाकावी. गॅस मध्यम असावा. या पोळया गारच चांगल्या लागतात म्हणून अगोदर करून ठेवाव्यात. घट्ट साजूक तुपाबरोबर गुळाची पोळी खावी. |