पावाचे वडे

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
एक मध्यम आकाराचा पाव, चण्याच्या डाळीचे पीठ, ओले खोबरे, ओल्या मिरच्या, आले, मीठ, तेल अगर तूप.

कृती :
  

पावाचे तुकडे करून पाण्यात भिजवावेत व तुकडे दाबून त्यांचे सर्व पाणी काढून टाकावे. तुकड्यांचा कुस्करून नरम गोळा करून घ्यावा. नंतर त्यात अंदाजाने चण्याचे पीठ घालावे. तसेच त्यात चवीप्रमाणे मीठ, ओले खोबरे आणि आले व ओल्या मिरच्या वाटून असे सर्व घालावे. व सर्व जिन्नस एकजिव होतील असे मळावे. नंतर त्या गोळयाचे लहान लहान वडे थापून ते तेलात अगर तुपात तळावे.

Hits: 484
X

Right Click

No right click