शाबुदाणा खिचडी
साहित्य :- |
दोन वाट्या साबूदाणा भिजवून ठेवावंा. अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याच्या कूट(शेंगदाणे मंद भाजावेत, जास्त लाल करू नयेत, दाण्याचा कूट सफेद असेल तर खिचडी पांढरी शुभ्र छान दिसते), दोन टेबलस्पून साजूक तूप, साखर, एक साल काढून बटाट्याच्या पातळ फोडी, कोंथिबीर व ओलं खोबरं, जिरे फोडणीस. |
|
कृती : |
पसरट कढईत तूप तापल्यावर जिरे फोडणीस घालून मिरचीचे तुकडे घालावेत व बटाट्याच्या फोडी धुऊन घालाव्यात. बटाटा शिजेपर्यंत परतावा. साबूदाण्यात शेंगदाण्याचा कूट मिसळून मीठ व साखर घालून मिक्स करणे, बटाटा शिजल्यावर साबूदाणा घालून सारखे परतावे. गॅस मंद ठेवावा. वाफ येऊन द्यावी. साबूदाणा शिजला की नरम होतो. साबूदाण्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. वरतून खोबरं कोथिंबिर घालावी. खिचडी मोकळी झाली पाहिजे. गोळा होता कामा नये. |