पाचक अन् पौष्टिक देठांचे सूप
साहित्य :- |
लाल माठ, चाकवत, पालक, कोथिंबिर इ. ची देठे, वाटीभर गोड ताक, मीठ, साखर, तूप-हिंग-जिरे फोडणीसाठी व सजावटीसाठी/ चवीसाठी वाफवलेले मटार दाणे. |
|
कृती : |
वरील सर्व देठे थोड्या पाण्यात उकडून घ्यावीत व मिक्सरमधून काढावीत. नंतर मीठ, साखर व ताक घालून उकळण्यास ठेवावे व सतत हलवावे. पाव चमचा तूप घेऊन खमंग फोडणी द्यावी. अंदाजे खर्च / किती माणसांना पुरेल : २ ते ३ रूपये - २ ते ३ माणसांना पुरते. |