जिलेबी
साहित्य :- |
२ वाट्या बारीक रवा, २ वाट्या मैदा, ४ टेस्पून आंबट दही, ३ टेस्पून पातळ डालडाचे मोहन, २ टेस्पून तांदळाचे पीठ, ३ टेस्पून डाळीचे पीठ, पीठ भिजवण्यासाठी कढत पाणी, ३ लिंबे थोडा केशरी रंग व थोडे केशर, अर्धा चमचा, रोझ इसेन्स |
|
कृती : |
रवा, मैदा, डाळीचे पीठ व तांदळाचे पीठ व पातळ डालडा एकत्र करून कढत पाण्याने पीठ भिजवावे. भज्याच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असावे. पीठाची गुठळी राहू देऊ नये. नंतर हे पीठ रात्रभर झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी साखरेत पाणी घालून एकतारी पाक करावा. त्यात केशरी रंग, केशर, लिंबाचा रस व रोझ इसेन्स घालावा. लहान परातीत किंवा फ्राइंर्ग पॅनमध्ये तूप घालून गॅसवर ठेवावे. पीठ खूप घोटून द्यावे. नारळाची करवंटी स्वच्छ करून त्यातील तीन डोळयांपैकी एक डोळा फोडून त्यात डावाने पीठ भरावे व परातीत जिलब्या घालाव्यात. नंतर लहान कात्रीने कापून जिलब्या सुट्या कराव्यात. उलटून तळाव्यात. नंतर विणायच्या सुईने उचलून जरा निथळून पाकात टाकाव्यात. पाक गरम असावा. दुसरा घाणा झाला की पहिल्या जिलब्या पाकातून काढाव्यात. जिलब्या काढताना विणायची सुई वापरावी किंवा लोखंडी उलथन्याच्या टोकाने उचलाव्यात. थंडीचे दिवस असतील तर आणखी एक अगोदर पीठ भिजवावे लागेल. |