काजूची चिक्की

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
एक वाटी काजू, एक वाटी साखर, थोडा आरारूट, अर्धी वाटी लिप्डि ग्लूकोज, तूप.

कृती :

काजूचे बारीक तुकडे करून ते किंचित भाजून घ्यावेत. साखरेचा पाणी न घालता पाक करावा. हा पाक अगदी मंद विस्तवावर करावा लागतो. साखर विरघळली की त्यात ग्लूकोज घाला. साखर व ग्लूकोज एकजीव झाल्यावर त्यात दोन चमचे तूप घालून काजूचे तुकडे घालावेत पोळपाटास आधीच तूप लावून ठेवावे. व त्यावर थोडा आरारूट टाकावा. लाटण्यालाही तुपाचा हात लावावा. पोळपाटावर वरील मिश्रण घालावे व लाटून लगेच वड्या कापाव्यात. ही चिक्की पारदर्शक होते. याप्रमाणेच बदाम अगर पिस्ते यांची चिक्की करावी. अथवा बदाम, पिस्ते व काजू यांची संमिश्र चिक्कीही करावी.

Hits: 410
X

Right Click

No right click