९१ वेअ. भा. मराठी साहित्य संमेलन, बडोदे – २०१८

संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख
९१ वेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बडोदे – २०१८ (आयोजक: मराठी वाङ्मय परिषद बडोदे)
भाषा आणि लेखनकला हे माणसाला व्यक्त होण्यासाठीचे एक माध्यमआहेआणि ह्या माध्यमांच्याआधारे व्यक्त होत असतांना साहित्याची - वाङ्मयाचीनिर्मिती होतअसते. वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य हे माणसाच्या प्रगतीसाठी पोषकअसते. अश्याप्रकारे साहित्याचे- वाङ्मयाच ेसमाजाच्या व पर्यायाने राष्ट्राच्या उत्कर्षात मोलाचे योगदानअसते. काळानुसार या साहित्यनिमिर्तीत आणि त्याच्या विषयातअनेक बदल होत असतात. आणि या बदलातून मराठी भाषेविषयीच्याआणि त्याच्या साहित्यविषयीच्या नवीन कल्पना, नवे विचार व काही समस्या समाजासमोर येतात. यावर सर्व विचारवंतांनी संयुक्तरित्या अभ्यासपूर्वक विचार करण ेआवश्यक असते. याचहेतूने दरवर्षी महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेरअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात येते.
आजवर अनेक संमेलने झाली. १८७८ साली पहिले मराठी साहित्य संमेलन, गोपाळ हरी देशमुखआणि न्या. रानडे यांनी सर्व ग्रंथकारांना एकत्र करून पुण्यात भरविले. त्यांनतर ही परंपराआजवरसुरुआहे. १९०९च्या सातव्या बडोदा संमेलनापासून "ग्रंथकारसंमेलन" हे नाव कमी होऊन "महाराष्ट्र साहित्य संमेलन" ह ेनाव रूढ झाले. १९५४ सालच्या दिल्लीत होणाऱ्या संमेलनासाठी महाराष्ट्र हे प्रादेशिक नाव वगळून " अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" हे व्यापक अर्थाचे नाव देण्यात आले.
"९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" बडोद्यामध्य ेझाले.( दि. १६, १७, १८फेब्रुवारी२०१८) गेली ८६ वर्ष ेमराठी भाषाआणि साहित्याचा प्रचार, प्रसार व संवर्धन यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या बडोद्यातील, "मराठी वाङ्मय परिषद, बडोदे" या संस्थेला संमेलनाच ेयजमानपद भूषविण्याची संधी प्राप्त झाली.
स्वतंत्र भारतात बडोद ेयेथे होणारे हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असून यापूर्वीची बडोद्यात झालेली तिन्ही संमेलने ही ब्रिटिशकालीन भारतात १९०९, १९२१आणि १९३४साली झाली होती. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर, साहित्यसम्राट न.चिं केळकर व नारायण गोविंद चापेकर हे अनुक्रम ेसंमेलनाच ेअध्यक ्षहोते. त्यानंतर ८३ वर्षांनंतर पुन्हा एकदा हा मान साहित्यनगरी बडोद्याला मिळाला.संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्रीमंत राजमाता शुभांगीनी राजे गायकवाड तर संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख होते.
लक्ष्मीकांत देशमुखयांनीआपल्या भाषणात ‘राजा तू चुकत आहेस’, ‘या राजाने सुधारायला हवे’ अशी विधाने केली.
‘‘लेखक-कवी जेव्हा माणसाच्या दु:ख, वेदना, शोषणाची कहाणी सांगत असतो व त्याचा आवाज बनत असतो, तेव्हा त्याला ज्या व्यवस्थेमुळे हे दु:ख होत ेत्यावर भाष्य तो करतो. खरा जातिवंत लेखक हा राजकीय लेखकच असतो, राजकीय भाष्यकारच असतो.’’
Hits: 143