४४. १९६२ सातारा - न. वि. गाडगीळ
Category: संमेलने ४१-५०
काकासाहेबांच्या मते चांगले साहित्य निर्माण करणे ही साहित्यिकांची जबाबदारी आहे. तसेच आजच्या लोकराज्यात ही जबाबदारी शासनाची पण आहे असे ते आग्रहाने प्रतिपादन करतात. शासन व साहित्य हे समाजपुरुषाचे दोन बाहु आहेत. साहित्य हा अर्थ व शासन हा शब्द या दोहोंच्या समन्वयात समाजाचे जीवन समृद्ध होत असते. साहित्य ही उपासना आहे, ती वासना नाही. ती वासना झाल्यास ते साहित्य उथळ बनते, त्या साहित्याची अवनती होते. साहित्याचा आनंद ब्रह्मस्वरूरूपाप्रमाणे निरपेक्ष आहे. साहित्याचे स्वरूप हे आनंदगर्भ असले पाहिजे. हा आनंद सुद्धा इंद्रियातीत असतो. तो व्यक्त करण्यासाठी शब्द उपयोगात आणावे लागले तरी खरे महत्व शब्दांचे नसून जे शब्दातीत आहे त्याचे आहे.
Hits: 387