श्री. राजा मंगळवेढेकर
मराठीतील एक साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून श्री. राजा मंगळवेढेकर यांची विशेष प्रसिद्धी आहे. स्वातंत्र्यलढ्यातील एक सैनिक, राष्ट्रसेवादल, आंतरभारती, साने गुरुजी कथामाला आदींशी त्यांचा निकटचा संबंध आहे.
साने गुरुजींच्या सहवासातून त्यांना साहित्यलेखनाची व मुलांसाठी कथाकथनाची प्रेरणा मिळाली असून त्यांची सुमारे २०० पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये बहुसंख्येने बालसाहित्याचा समावेश आहे.
'साने गुरुजींची जीवनगाथा' हे साने गुरुजींचे विस्तृत चरित्र तसेच 'मित्राय नमः', 'मित्राय नमो नमो?, 'मत्रदेवोभव' या पुस्तकांमधून त्यांनी काही विशेष व्यक्तींचा 'परिचय घडविला आहे. 'आठवणीतील अण्णा-गदिमा', 'शाहीर ग. दि. माडगूळकर', 'समुद्र, मासा आणि माणूस', 'अखेरची झुंज' ही पुस्तके तसेच 'रंग आणि चित्रांगण' हे त्यांचे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. 'कथा आणि कथाकथन' व 'बिनभिंतीची उघडी शाळा' हेही त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. १९८५ साली पुण्यात भरलेल्या 'बालकुमार' साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. गेली ५० वर्षे महाराष्ट्रभर हिंडून खास मुलांसाठी कथाकथन करून साने गुरुजींची परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवलेली आहे.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा 'बालसेवा' पुरस्कार, कोपरगाव येथील स्वातंत्र्यसैनिक श्री. मामा गवारे फाउंडेशनचा 'बालआनंद' पुरस्कार, प्रा. बाबुराव शिरोळे हा बालसाहित्य लेखकासाठीचा पुरस्कार, फुलराणी थिएटरचा 'पंडित , जवाहरलाल नेहरू स्मृती' पुरस्कार, महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा गदिभा प्रतिष्ठानचा 'गदिमा' पुरस्कार तसेच, केंद्र व राज्यशाखाचे उत्कृष्ट वाडूमय निर्मितीचे पुरस्कार आदी पुरस्कारांनी ते सन्मानीत झालेले आहेत संदर्भ - 'सेनानी साने गुरुजी' हे त्यांचे पुस्तक, प्रकाशक- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
Hits: 191