चिंतामणी
पुणे जिल्ह्यातील व पुणे शहरापासून अगदी नजिक असलेल्या या देवस्थानी असलेला गणपती `श्रीचिंतामणी' या नावाने ओळखला जातो. थेऊर येथील गणेशमूर्ती स्वयंभू व उजव्या सोंडेची आहे. मंदिराचे महाद्वार उत्तरभिमुख आहे पण मूर्ती मात्र पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून सभामंडपही मोठा आहे. देवळाच्या तिन्ही बाजूंना मुळा व मुठा या दोन नद्यांचा वेढा आहे. पुणे नजिकच्या चिंचवड येथील मोरया गोसावी या तपस्वी पुरूषाने या ठिकाणी गणपतीची उपासना करून सिद्धी प्राप्त केली होती, असा ऐतिहासिक दाखला असून थेऊर येथील मंदिर मात्र मोरया गोसावी यांचे सुपुत्र चिंतामणी देव यांनी बांधले आहे. श्रीमंत माधवराव पेशवे यांना या गणेशस्थानाबद्दल अखेरपावेतो प्रेम वाटत होते. त्यांचा मृत्यूही या मंदिराच्या आसमंतातच झाला. |