कटलेट
साहित्य :- |
दोन वाट्या गाजराचा कीस, एक वाटी चिरलेली फरसबी, एक वाटी चिरलेला कांदा, एक वाटी मटार, ब्रेडच्या दोन - तीन स्लाईसेस, दीड वाटी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, अर्धी ते पाऊण वाटी ब्रेडचा चुरा, नऊ - दहा ओल्या मिरच्या, चिरलेली कोथिंबीर, मीठ, आले, तेल |
|
कृती : |
बटाट्याच्या फोडी बारीक कु स्करुन घ्याव्यात. गाजराचा कीस व फरसबी थोड्या तेलावर वाफवून घ्यावी. मटारही किंचिंत तेलावर वाफवून अर्धवट ठचून घ्यावेत. मीठ, मिरच्या व आले वाटावे. तो वाटलेला गोळा, कांदा, गाजराचा कीस, फरसबी, वाफवलेले मटार, बटाट्याच्या कुस्करलेला गोळा व कोथिंबीर असे सर्व एकत्र करून चांगले कालवावे. ब्रेडच्या स्लायसेस पाण्यात भिजवून घेऊन कुस्करून त्याही वरील मिश्रणात कालवाव्यात. या मिश्रणाचे लहान लहान गोळे घेऊन त्याला अर्धा ते पाऊण इंच जाड व लंबवर्तुळाकार असा आकार द्यावा. काही निराळा आकार देण्यासही हरकत नाही. (कटलेटचे साचेही बाजारात मिळतात) नंतर या कटलेटला सर्व बांजूनी ब्रेडचा चुरा लावून तव्यावर चमचाभर तेल घालून ते तांबूस रंगावर परतावेत, अगर तेलात तळून काढावेत. तळावयाचे झाल्यास मैद्याच्या पाण्यात बुडवून घेऊन व ब्रेडचा चुरा लावून तळावेत. हे कटलेट सॉस अगर टोमॅटो-केचपबरोबर खावयास द्यावे. |